ठाणे : ठाणे भारत स्काऊट गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा माजी शिक्षणाधिकारी अशोक मिसाळ याना भारत स्काऊट आणि गाईड संस्थेकडून दिला जाणारा 'बार तो मेडल ऑफ मेरिट राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे. बार तो मेडल ऑफ मेरिट राष्ट्रीय पुरस्कार हा भारत स्काऊट आणि गाईड संस्थेकडून हा नामांकीत व्यक्तींना देऊन गौरविण्यात येते. त्यात मिसाळ यांचा या राष्ट्रीय पातळीच्या पुरस्कारासाठी सन्मानित केले आहे. सोमवार 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्काऊट गाईड पव्हेलीयन, शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे मिसाळ यांना या "बार तो मेडल ऑफ मेरिट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
स्काऊट गाईड चळवळीच्या प्रचार व प्रसार तसेच गुणवत्ता वाढ यात उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मिसाळ यांनी जून 2011 पासून ते आजपर्यंत जिल्हा मुख्य आयुक्त म्हणून गाईड चे कामकाज यशस्वीपणे सांभाळून जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात सातत्याने गुणवत्ता यादीत प्राधान्याने राखण्यात यश मिळविले आहे. विविध उपक्रमांसाठी ठाणे जिल्ह्याला राज्यस्तरावर गौरविला जात आहे. खरी कमाई या उपक्रमात त्यांनी महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांपासून अव्वल स्थान टिकून आहे. राज्यस्तरावरील सर्व उपक्रमात तसेच विविध कार्यात ठाणे जिल्हा मिसाळ यांच्या नेतृत्त्वात सातत्याने यश संपादन करते आहे.