शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

बारवी धरण भरले, चार दरवाजे उघडून पाण्याच्या विसर्गास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:34 AM

रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या धरणावर जलपुजन करण्यात आले असून  ते आज रात्री तुडुंब भरुन वाहू लागले.

 -सुरेश लोखंडेठाणे : अंबरनाथ तालुक्यातील एम आयडीसीच्या मालकीचे बारवी धरण रात्री 10.30 भरले असून त्याचे चार गेटमधून पाणी वाहू लागले आहे.  या बारवी धरणाची पातळी 72.60 मीटर असून ती आज पूर्ण भरली आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले जाऊन त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे . बारवी धरण भरण्यास गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना विलंब झाला आहे. या धरणात आता मुबलक पाणी साठा तयार झाल्यामुळे ठाणेच्या काही भागासह कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर, भिवंडी, मीराभाईंदर या मनपासह अंबरनाथ, बदलापून नगर परिषद, जिल्ह्यातील सर्व एम आयडीसील परिसर, कारखाने, आणि भिवंडीसह अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील गांवखेड्यांच्या पाणी कपातीची समस्या मिटली आहे. 

रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या धरणावर जलपुजन करण्यात आले असून  ते आज रात्री तुडुंब भरुन वाहू लागले. रविवारी रात्री 10.30 वाजता या धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याचे ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले. 

बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाणी जादा होताच कोणत्याही क्षणी उघडणार असल्याचा आंदाज घेऊन गुरुवारीच भातसा धर्माप्रमाणे या बारवी धरणाखालील व या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बारवी धरण व नदी काठावरील अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा संबंधी तलाठी, ग्राम सेवक आणि सरपंच यांच्या मार्फत देण्यात आला आहे. या मध्ये अस्नोली, राहटोली, चोण, सागांव पाटीलपाडा, चांदप, पादीर पाडा, पिंपळोली , कारंद, चांदप पाडा आदी गांवांसह नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एम आयडीसी क्षेत्राला पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणात आज रात्री पासून जोरदार पाऊस सुरु आहे. 86 मिमी पाऊस सकाळपर्यंतधरणात पडला आहे.  आता यााबारवी धरणात 95.35 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. रविवारी धरणाची 72.60 पैकी केवळ 0.23 सेंटीमीटर पाणी पातळी पैकी भरण्यासाठी  बाकी होती. या धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता गुरुवारी वर्तवण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या धरणासह बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या नदीच्या पात्रात व वाहत्या पाण्यााची पातळी वाढणार असल्यामुळे या पाण्यात उतरण्याला बंदी घातली आहे.या सतर्कता इशारा स्थानिक प्रशासनाकडून संबंधित गावांना देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सीईओ शिवाजी पाटील यांनी गुरुवारीच जारी केले आहेत. याशिवाय या धरणाची मालकी असलेल्या एम आयडीसी विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ही संबंत प्रशासनास सतर्कतेचा इशारा आधीच दिला आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीthaneठाणे