लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात आतार्पयत म्युकरमोयकोसिस या आजाराचे रुग्ण दिवासगणिक झपाटय़ाने वाढू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील काही दिवसात दुपटीने रुग्ण वाढतांना दिसत आहेत. आतार्पयत जिल्ह्यात या आजाराचे ११७ रुग्ण आढळले असून त्यातील १० जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणो दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणोने दिला आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे, अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले. परंतु आता ज्यांनी रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशांना देखील या आजाराची लागण होण्याच्या शक्यता नाकारता येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर योग्य ते उपचार घेणो हाच यावरील मार्ग असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनापाठोपाठ आता या आजाराने जिल्ह्यात हळू हळू डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसात तर या आजाराचे रुग्ण वेगाने वाढतांना दिसू लागले आहेत. त्यानुसार आतार्पयत जिल्ह्यात ११७ म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून आले असून त्यातील १० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. यातील तीन रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर यातील बहुसंख्य रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना दिसत आहेत.
तर यामध्ये सर्वाधिक ४० रुग्ण हे महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. तर त्या खालोखाल नवी मुंबईत ३४, कल्याणमध्ये २९, उल्हासनगर ३, भिवंडी १, मिराभाईंदर ८, अंबरनाथ १, बदलापुर १ अशा पध्दतीने या रुग्णांची संख्या आहे. सुदैवाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आजाराचा रुग्ण अद्यापही आढळून आलेला नाही. तर रोजच्या रोज जिल्ह्यात सरासरी ११ च्या आसपास नवे रुग्ण या आजाराचे सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या आजाराच्या ठाण्यात १, नवी मुंबईत ५ रुग्णांचा मृत्यु झाला असून कल्याणमध्ये ३ आणि उल्हासनगरमधील एकाचा यात मृत्यु झाला आहे.
औषधांचा मुबलक साठाया आजारात शासकीय रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरु असतील तर त्याला मोफत औषध उपचार केले जात आहेत. त्यासाठी लागणारा औषधा साठा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत देण्यात आली आहे. तज्ञ डॉक्टरांची टिम सज्जजिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेस्थेशीया, कान, नाक, घसा तज्ञ आदींची 7 जणांची टीम सज्ज करण्यात आली आहे. तसेच चार ते पाच दंत चिकित्सक देखील उपलब्ध आहेत. तर बाहेरुन देखील तज्ञ डॉक्टरांची टीम घेतली जाणार असून न्युरो सजर्नही उपलब्ध करुन घेतला जाणार आहे.(कैलाश पवार - जिल्हा शल्यचिकि त्सक - ठाणे )