डोंबिवली : शाळांच्या वार्षिक परीक्षा महिनाभरात संपत आहेत. मुलांचे त्यानंतर पाय आपोआपच उद्यानांकडे वळतील. पण, शहरातील महापालिका उद्यानांची स्थिती फारशी चांगली नाही. त्याबाबत, मुलांनी नाराजी व्यक्त केली. ‘सुंदर, स्वच्छ, हरित डोंबिवली’ची आवश्यकता बोलून दाखवताना ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनीही खारीचा वाटा उचलला. ‘लोकमत’च्या ‘काहीतरी कर डोंबिवलीकर’ उपक्रमांतर्गत त्यांनी उद्यानाची स्वच्छता केली.शुक्रवारी सकाळी शहरातील ज्ञानमंदिर विद्यालय आणि आजदे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वेतील नेहरू रोडवरील शिवाजी उद्यानाची स्वच्छता केली. सकाळी ९ वाजल्यापासून ११.३० पर्यंत टप्प्याने या मोहिमेत सहभागी झाले. डोक्यावर टोपी, नाकातोंडाला मास्क आणि हातात झाडू घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तेथील पालापाचोळा, प्लॅस्टिकच्या पिशव्या व अन्य कचरा गोळा केला. तो त्यांनी स्वयंशिस्तीनेच महापालिकेच्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये भरला. स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)पथनाट्यातून रस्ते न खोदण्याचा संदेशरस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्याकडेही ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. पथनाट्य सादर करत त्यांनी रस्ते न खोदण्याचा संदेश दिला. चांगले रस्ते तयार झाले की, अल्पावधीतच ते पाण्याची पाइपलाइन, वीज, अथवा दूरध्वनीच्या केबलसाठी, मंडपांसाठी खोदले जातात. त्याचा त्रास वाहनचालक व पादचाऱ्यांना होतो. त्यामुळे सर्रास रस्ते खोदू नका, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
सुंदर, स्वच्छ, हरित डोंबिवलीची आवश्यकता
By admin | Published: March 12, 2016 2:02 AM