उल्हासनगर : विशेष समिती सभापती निवडणुकीपूर्वी महापौरपदाचा राजीनामा मीना आयलानी यांनी न दिल्यास साई पक्षाला सहकार्य करणार नाही, असा पवित्रा ओमी कलानी यांनी घेतल्याने शहरात इदनानी-कलानी आमने-सामने उभे ठाकले आहेत. साई पक्षाच्या असहकार्याच्या धोरणामुळेच ओमी टीमच्या महापौरपदाला ग्रहण लागल्याची खंत ओमी यांनी व्यक्त केली.साई पक्षाच्या असहकार धोरणामुळेच महापौरपद आपल्याला हुलकावणी देत आहे, अशी धारणा ओमी यांची झाली असून त्यांनी विशेष समिती सभापतीच्या निवडणुकीत साई पक्षाला मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे.बांधकाम समिती, सार्वजनिक आरोग्य, गलिच्छ वस्ती व पुनर्विकास आणि महसूल समितीच्या सभापतीपदासाठी साई पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ओमी टीमने साई पक्षाला सहकार्य न केल्यास तेथे शिवसेनेचे व सहकारी काँग्रेस व पीआरपीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजपासोबत आघाडीसाई पक्षाने शहरहित डोळ्यासमोर ठेवून ओमी टीम नव्हे तर भाजपासोबत आघाडी केली आहे. महापौरपद देण्याचा प्रश्न भाजपाचा अंतर्गत असून भाजपाच्या प्रत्येक निर्णयाला साई पक्षाने समर्थन दिले आहे. महापौरपदाचा निर्णय भाजपाला घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया जीवन इदनानी यांनी दिली आहे.
साई पक्षामुळेच महापौरपद हुकले, ओमींचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:49 AM