उल्हासनगर : रस्त्यातील खड्डे भरणे व दुरुस्तीसाठी काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मंगळवारी भीख मांगो आंदोलन करून आयुक्तांची भेट घेतली. भेटीवेळी आयुक्तांनी रस्त्यांतील खड्डे भरण्याचे आश्वासन दिल्यावर, आंदोलनकर्त्यांनी भीक मागून जमा झालेले पैसे पालिका तिजोरीत जमा केले.
उल्हासनगरमध्ये रस्त्यांची दुरवस्था होऊन बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांतील तात्पुरते खड्डे भरण्यासाठी सातवेळा निविदा देऊनही कंत्राटदार मिळाला नसल्याने रस्तादुरुस्तीचे काम रेंगाळले. दरम्यान, आयुक्तांनी कंत्राटदाराबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्यावर निविदेला प्रतिसाद मिळाला. ओमी टीम, भाजप, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांबाबत धरणे आंदोलन करून आयुक्तांना जाब विचारला. यावेळी खड्डे भरण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.खड्डे भरण्यासाठी काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी दुपारी शिवाजी चौक परिसरात एकत्र येत हे आंदोलन केले. आंदोलनानंतर समाजसेवी संघटनेचे शशिकांत दायमा, निखिल गोळे आदींनी आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन खड्डे भरण्याची विनंती केली.आयुक्त देशमुख यांनी समाजसेवी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची समजूत काढून कामे रखडल्याची माहिती दिली. तसेच रस्त्यातील खड्डे भरणे व दुरुस्तीचे काम सणासुदीच्या दिवसांपूर्वी सुरू करण्याचे आश्वासन दिले.यावेळी भीख मांगो आंदोलनात जमा झालेली दोन हजार ५८५ रुपये पालिका तिजोरीत जमा करण्याची विनंती आंदोलनकर्त्यांनी केली. आयुक्तांनी आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांना ती रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. पालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.राष्ट्रवादीचाही इशाराच्कॅम्प नं.-५ येथील नेताजी गार्डन नूतनीकरणाच्या नावाखाली खोदून ठेवले आहे. वर्षभरापासून उद्यानाची अवस्था वाईट झाली असून दुरुस्तीची मागणी पालिकेकडे केली.च्तसेच एका आठवड्यात दुरुस्ती केली नाहीतर, उद्यानाबाहेर पक्षाच्या वतीने भीख मांगो आंदोेलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.