ठाणे - डायघर भागातील विविध विकास कामांचे प्रस्ताव आता टप्याटप्याने मार्गी लागण्यास सुरवात झाली आहे. रविवारी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने डायघर तसेच परिसरातील गावांकरिता ठाणे महापालिकाआयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आलेल्या एकात्मिक विकास प्रकल्पातंर्गत विविध विकास कामांना सुरूवात करण्यात आली. यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदींसह इतर कामांचा त्यात समावेश आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत दिवा प्रभाग समिती अंतर्गत बहुतांश भाग हा ग्रामीण स्वरु पाचा आहे. या भागाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता या परिसराच्या विकास कामांसाठी सुक्ष्म नियोजनाची गरज होती. यासंदर्भात स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक यांनी वेळोवेळी सुचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डायघर व आजुबाजुच्या गावांमध्ये मुलभुत सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने एक विशेष एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या एकात्मिक विकास प्रकल्प अंतर्गत विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये दिवा प्रभाग समितीमधील डायघर रस्त्याचे कल्याण फाटा ते काशिनाथ चौकापर्यंत डांबरीकरण पध्दतीने पुनर्बांधणी व पुनर्पृष्टीकरण करणे, डायघर व खिडकाळी येथील स्मशानभुमीची सुधारणा आणि आधुनिकीकरण तसेच रस्त्याचे काम करणे आदी कामांचा त्यात समावेश आहे.
महापालिकेच्या वतीने डायघर मधील विविध विकास कामांचा झाला शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 3:51 PM
मागील कित्येक वर्षे विकासापासून लांब असलेल्या डायघर आणि आजूबाजूच्या गावांच्या विकासाचा नारळ अखेर वाढविला गेला आहे. येथील विविध विकास कामांना नुकतीच सुरवात झाली आहे.
ठळक मुद्देरस्त्यांचे डांबरीकरण झाले सुरुस्मशानभुमीची सुधारणा