शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

लाभार्थ्यांना ना घरे, ना भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:04 AM

इंदिरानगरातील बीएसयूपी योजनेतील घरे लाभार्थ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर त्यांना भाडे देण्याचा निर्णयही घेण्यात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे

डोंबिवली : इंदिरानगरातील बीएसयूपी योजनेतील घरे लाभार्थ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर त्यांना भाडे देण्याचा निर्णयही घेण्यात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा माजी शिवसेना नगरसेवक तात्या माने यांनी दिला आहे.इंदिरानगर झोपडपट्टीतील बीएसयूपी योजनेत बांधलेली घरे देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून २८४ लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. या यादीतील काही लाभार्थी हे घुसखोर होते. त्यांची नावे वगळण्यात यावी, यासाठी माने यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. योग्य लाभार्थ्यांना घरे दिली जात नसल्याने माने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आॅक्टोबर २०१६ मध्ये या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने लाभार्थ्यांना घराचे भाडे देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, लाभार्थ्यांना केवळ पाच महिन्यांचे भाडे दिले गेले. त्यानंतर, अद्याप भाडे दिलेले नाही. लाभार्थ्यांना भाडे देण्याचा निर्णय आयुक्त व कंत्राटदाराने याचिकाकर्त्यांसह बैठक घेऊन निकाली काढणे अपेक्षित होते. त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. ज्याप्रमाणे घरे देण्याचा निर्णय घेतलेला नाही, त्याचप्रमाणे दुकानाचे गाळे बाधितांना देण्यात आलेले नाही. दुकानाचे गाळे व पहिल्या मजल्यावरील घरांचे वाटप न करण्यामागील कारण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही जणांनी योजनेत स्वत:ला लाभार्थी भासवून घुसखोरी केली होती. खरे २८ लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. मार्च २०१७ मध्ये त्याविषयीचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. वर्ष उलटून गेले तरी या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. ठरावाची अंमलबजावणी केली जात नसल्याने वंचित लाभार्थ्यांनी महापालिकेविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. तत्कालीन महापौरांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नका, असे आवाहन केले होते. लाभार्थ्यांनी उपोषणाचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला होता. आता पुन्हा उपोषणाचा इशारा दिला असून तो मागे घेतला जाणार नाही, याकडे माने यांनी लक्ष वेधले.