बेस्टने अनेक ठिकाणी बसच्या तिकिटांचे दर कमी केल्यामुळे अन्य पालिका परिवहन सेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच ठाण्यात खासगी बस धावतात आणि त्याही वेळेवर, त्यामुळे प्रवासी त्याचा फायदा घेतात. दुसरीकडे टीएमटीच्या बस कधीही वेळेत येत नसल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. प्रवासीसंख्या कमी होणे ही गंभीर बाब असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालिका क्षेत्रातील परिवहनची आज नेमकी काय अवस्था आहे, याचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी अजित मांडके, प्रशांत माने, धीरज परब, सदानंद नाईक यांनी...णे महापालिकेचे अंग असलेल्या परिवहन सेवेचा गाडा अद्यापही खड्यातच रुतलेला आहे. एकीकडे दरवर्षी पालिकेच्या अनुदानावर परिवहन सेवेला अवलंबून राहावे लागत आहेत तर दुसरीकडे बेस्टने तिकीट दर कमी केल्याने, शिवाय खाजगी बसची वाढलेली संख्या, रिक्षा, इतर प्राधिकरणाच्या बसमुळे परिवहनच्या उत्पन्नासह प्रवाशांच्या संख्येवरही परिणाम झाला आहे. मात्र आता पर्यावरण अहवालात देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याने सांगत प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा परिवहनने केला आहे. असे जरी असले तरी जीसीसीच्या माध्यमातून ज्या बस रस्त्यावर धावत आहेत, त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नावरच परिवहनचा गाडा हाकला जात आहे.परिवहन सेवेमार्फत काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या अंदजापत्रकात अनुदानापोटी २९८ कोटींची अपेक्षा व्यक्त केली होती. तर २०१९-२० चा ४७६ कोटी १२ लाखांचा अंदाजपत्रक झाला होता. परंतु पालिकेने मात्र १३२ कोटींचे अनुदान प्रस्तावित केले आहे. त्यामुळे परिवहनच्या पदरी निराशा पडली आहे. दरम्यान, ठाणे परिवहन सेवेची सुरूवात १९८९ च्या सुमारास झाली. त्यावेळेस केवळ २५ बस परिवहनच्या ताफ्यात होत्या. आज परिवहनच्या ताफ्यात ४ पेक्षा अधिक बस असल्या तरी प्रत्यक्षात २८० ते २९० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. त्यातही यामध्ये जीसीसीच्या माध्यमातून धावणाºया बसची संख्या ही १८० च्या आसपास आहे. याचाच अर्थ परिवहनच्या ताफ्यातून रोज वागळे आणि कळवा आगारातून १०० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत.वास्तविक पाहता परिवहनच्या हक्काच्या ३५७ बस होत्या. त्यातील अनेक बस दुरुस्तीपोटी धूळखात आहेत. मध्यतंरी यातील १५० बस दुरुस्त करुन त्यासुध्दा जीसीसीच्या माध्यमातून चालविण्यासाठी देण्याचा घाट परिवहन सेवेने आखला होता. मात्र अद्याप हे काम यशस्वी झालेले नाही. मूळात परिवहनकडून किरकोळ कारणासाठी बंद ठेवण्यात आलेल्या बस दुरुस्त होऊन रस्त्यावर धावल्या तरी परिवहनचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे. मात्र त्यासाठी धाडसी निर्णय घेणार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. परिवहन समिती ही सुध्दा असून नसल्यासारखीच आहे. त्याची मिटींग होते, किंवा नाही, याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे आंधळे दळतेय आणि कुत्र पीठ खातय अशीच अवस्था परिवहनची झालेली आहे.ठाणे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या ४६७ बसपैकी परिवहन सेवेच्या २७७ बस दैनंदिन संचलनात १९० बस जीसीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. परिवहन सेवेच्या २७७ बसपैकी २०१८-१९ मध्ये १०८ बस संचलनास उपलब्ध झाल्या होत्या. उर्वरित नादुरुस्त बसपैकी १२० बस दुरुस्त करुन व्होल्वोच्या ३० बससह १५० बस जीसीसी तत्वावर २०१९-२० या आर्थिक वर्षात चालविण्यात येणार असे सांगितले होते. मात्र तसे काही घडलेले नाही. आता परिवहनच्या ताफ्यात १० तेजस्विनी बसही दाखल झाल्या आहेत. परिवहनच्या ताफ्यात १०० इलेक्ट्रीक बस दाखल होणार होत्या. मात्र मागील वर्षभरापासून रस्त्यावर एकच बस धावत आहे. अन्य बस केव्हा येणार, त्या येणार की नाही, याचीही माहिती परिवहन प्रशासनाकडे उपलब्ध नाही. केवळ २०२० मध्ये ५०० हून अधिक बस परिवहन सेवेत दाखल होतील असा दावा केला जात होता. मात्र तोही दावा फोल ठरताना दिसत आहे.मधल्या काळात भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहनने पुढे आणला होता. यापूर्वी २००३ मध्ये पहिल्यांदा भाडेवाढ केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पाचव्यांदा भाडेवाढ केली. यावेळेस भाडेवाढ करताना परिवहन प्रशासनाने यापुढे डिझेल, सीएनजी आणि इतर साहित्यांचे दर जसे वाढतील तशी भाडेवाढ केली जाईल असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता पुन्हा भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु इतर उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांपासून सुध्दा दरवर्षीप्रमाणे हा गाडाही कोलमडलेलाच दिसला. तरीही बसवरील जाहिरात भाड्यापोटी, विद्यार्थी पास पोटी, निरुपयोगी वाहन वस्तू विक्रीपोटी, पोलीस खात्याकडून प्रतिपूर्ती पोटी अणि किरकोळ उत्पन्नापोटी उत्पन्नाची अपेक्षा धरण्यात आली आहे ती पूर्ण होईल का? हाही प्रश्नच आहे.अनेक वर्षे कागदी घोडे नाचविल्यानंतर वर्षभरापासून ठाणे परिवहन सेवेत इ तिकीट सेवेचा शुभारंभ झाला आहे. तरीही परिवहनला दरवर्षी ८३.९२ कोटींची तूट सहन करावी लागत आहे. याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित झाला आहे. दुसरीकडे प्रवासी वाढविण्यासाठी परिवहनमार्फत कोणतीही मोहीम राबविली जात नाही. परिवहनच्या ताफ्यात ४०० हून अधिक बस असल्यातरी परिवहनचे तिकीट दर परवडणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवासी इतर साधनांचा वापर करत आहेत.पर्यावरण अहवालात परिवहनचे प्रवासी घटल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आता परिवहन प्रशासनाने परिवहनचे प्रवासी वाढल्याचा दावा केला आहे.>बेस्टची दर कपातपरिवहन सेवेचे प्रवासी पळविण्यात बेस्टचा मोठा वाटा आहे. आधी बेस्टने प्रवास करणे शक्य नसल्याने प्रवासी इतर माध्यमांचा वापर करीत होते. मात्र आता बेस्टने सरसकट ५ आणि १० रुपये तिकीट आकारण्यास सुरवात केल्याने परिवहनला याचा फटका बसला आहे. त्यामुळे प्रवाशांना या सुविधांचा लाभ होत आहे.>खाजगी बसचे जाळेखाजगी बसवर केवळ वरवरच कारवाई केली जाते. मात्र आताही या बसचे जाळे घोडबंदर, लोकमान्य, वर्तकनगर या भागात पसरलेले आहे. परिवहनच्या बस वेळेत नसल्याने आणि त्यांचे भाडे जास्त असल्याने प्रवासीही या खाजगी बसने प्रवास करणे अधिक पसंत करतात.>शेअर रिक्षांचे प्रस्थटीएमटीच्या प्रत्येक थांब्यावर आता शेअर रिक्षावाल्यांचे प्रस्थ आहे. त्यामुळे १० रुपये, १५ रुपये, २० रुपये आणि ३० रुपयात नॉनस्टॉप प्रवास देण्याची हमी रिक्षावाले देत असल्याने आणि वेळही वाचत असल्याने त्याचाही फटका परिवहनला बसला आहे.>वेळेचे नियोजन कोलमडलेलेइतर प्राधिकरणांच्या बस या थोड्याफार वेळाच्या फरकाने धावतात. मात्र परिवहन सेवेचे वेळापत्रक नेहमीच कोलमडलेले दिसते. रोज प्रवाशांना त्याच वेळेत बस मिळेल असे नाही. सॅटिसवर तर काही वेळेस अशी परिस्थिती असते की, ज्या ठिकाणी प्रवाशांची रांग मोठी त्या ठिकाणी बस सोडली जाते.>इतर प्राधिकरणांचाही फटका : ठाणे परिवहनच्या बस बोरिवली आणि मीरा रोड, मुलुंड या मार्गावर धावतात. मात्र इतर प्राधिकरणाच्या बस नवी मुंबईतून ठाण्यासाठी बोरिवली, तर वसई, नालासोपारा आदी बसही ठाण्यात येऊ लागल्या असून त्याचाही परिणाम परिवहनच्या उत्पन्नावर होत आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजच्याघडीला ४६७ बस आहेत. परिवहनचे उत्पन्न २९ लाखांच्या आसपास आहे. परिवहनचे २०२ मार्ग असून या मार्गावर या बस चालविल्या जातात. परिवहमध्ये १ हजार ९९८ कर्मचारी, अधिकारी वर्ग आहे.>परिवहनच्या ताफ्यात बसची संख्या पुरेशी आहे. तसेच परिवहनमधून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्याही वाढत आहे. मात्र इतर प्राधिकरणांमुळे परिवहनच्या उत्पन्नावर थोड्याफार प्रमाणात परिणाम झालेला आहे. मात्र आम्ही उत्पन्न वाढीबरोबर प्रवासी वाढविण्यासाठीही प्रयत्न करीत आहोत.- संदीप माळवी, व्यवस्थापक, ठाणे परिवहन सेवा
‘टीएमटी’ला बेस्ट, खासगी बसचे ग्रहण, टीएमटीची प्रवासीसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 1:28 AM