ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दोन हजार ५६३ बचत गटांना ४८ कोटी १७ हजार रूपयांचे बँक लिंकेजचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) ठाणे जिल्ह्याने राज्यात सर्वोत्कृष्ट म्हणून प्रथम क्रमांक पटकवल्याचे राज्यस्तरीय आढाव बैठकीत उघड झाले.महिला आर्थिक विकास महामंडळचा राज्यस्तरीय २०१७-१८ चा वार्षिक आढावा आठवडाभरापूर्वी अलिबाग येथील रेडिशन ब्लु या हॉटेलमध्ये पार पडला. त्यामुळे ठाणे जिल्हा राज्यभरातील जिल्ह्यांच्या तुलनेत अव्वल ठरल्याचे उघड झाले. ठाणे जिल्ह्यात एमएसआरएलएम , एनयूएलएम, तेजिस्वनी, अल्पसंख्याक, आदी योजनेच्या माध्यमातून काम केले जात आहे. ठाणे जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात दोन हजार ५६३ बचत गटांना ४८ कोटी १७ हजार रु पयांचे बँक लिंकेज केल्याचे निश्चित झाले. तर शहरी भागातील ११ नगर पालिका व महानगरपालिका अंतर्गत सर्वात जास्त म्हणज एक हजार ५० बचत गटांची स्थापना करण्यात आली. या शिवाय ८९४ बचत गटांना फिरता निधी मिळवून दिला. याच योजनेअंतर्गत ४० वस्तीस्तरीय संघांची स्थापना ठाणे जिल्ह्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाने केली. या उत्कृष्ट कार्याची दखल या रायगड चे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंद्रा मालो, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आढावा झाला . या वेळी महाराष्ट्रातील कामाचा सर्वात जास्त लोड असलेल्या जिल्ह्यात ठाणे जिल्ह्याने प्रथम क्र मांक पटकावला. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, अमेरिकेतील एनजीओ, शिवाय आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील १३ भेटी ठाण्यातील कामकाज पाहण्यासाठी झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भगातील बचत गट, शहरात भाजीपाला उपलब्ध करून देतात. या गटांना सोयीचे जावे म्हणून मविम ने चार हरित व्हॅन उपलब्ध करून दिले आहेत, त्याचे ही उदघाटन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले.यावेळी ठाणे जिल्ह्याला मविमचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंद्रा मलो व महाव्यवस्थापक कुसुम बाळसारफ यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलेल्यांमध्ये कोकण विभागाचे आरएमओ मंगेश सूर्यवंशी, ठाणे जिल्ह्याचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी लिंबराज कुंभार, वर्षा पाटील, सहा सनियंत्रण अधिकारी इंदिरा निश्चित, योगिनी भिलारे, सुरज वाघात यांचा समावेश आहे.