शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निवडणूक आयोगाकडून लाेकशाहीचा विश्वासघात; भास्कर जाधव यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 7:12 AM

मुख्यमंत्र्यांवरही केला हल्लाबाेल शिवसेना या मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले आणि ज्यांनी पक्षातून बंडखोरी आणि गद्दारी केली, त्यांना ते देण्यात आले. अशी घटना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीच घडली नव्हती.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : बाळासाहेबांनी देव म्हणून पूजलेला धनुष्यबाण निवडणूक आयोगाने चोरांच्या हाती दिला आहे. आयोगाने घटनेचा, लोकशाहीचा आणि शिवसेनेचाही विश्वासघात केला. सरकारी यंत्रणा, स्वायत्त संस्था बटिक झाल्या असून, न्याय मिळवण्यासाठी नागरिकांच्या न्यायालयात जाऊ. जनता जनार्दनच आता न्याय देईल, असा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.   

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रविवारी सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवगर्जना मेळावा झाला. खा. अरविंद सावंत, खा. राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी मिळणार आहे. आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करा, असे भाजपचे लोक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकाल येण्यापूर्वीच सांगत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला असला तरी हा निकाल कोणत्या तरी पक्षाच्या कार्यालयातून लिहून आला आहे.

शिवसेना या मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले आणि ज्यांनी पक्षातून बंडखोरी आणि गद्दारी केली, त्यांना ते देण्यात आले. अशी घटना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीच घडली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला, तेव्हा काँग्रेस पक्षावर किंवा चिन्हावर आपला हक्क सांगितला नाही. त्यांनी शिवसैनिकांना खचून जाऊ नका, असा सल्लाही दिला. एकनाथ शिंदे आणि माझे वैयक्तिक भांडण नाही; पण ही लढाई तत्त्वांची आहे. तत्त्वांच्या लढाईत सख्खा भाऊ जरी आला तरी त्याला सोडता कामा नये, असे धर्मशास्त्र सांगते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव