शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

सावधान! जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या बनावट वेबसाईट्सचा सुळसुळाट

By सुरेश लोखंडे | Published: March 31, 2023 7:16 PM

"बनावट, फसव्या संकेतस्थळाकडून फसवणूक होणार नाही, यासाठी शासनाचे crsorgi.gov.in हे संकेतस्थळ लाभार्थांनी वापरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले."

ठाणे : अनेक सार्वजनिक माध्यमातून जन्म, मृत्यू प्रमाणपत्राच्या वाटपाबाबत लोकांमध्ये अफवा पसरवली जात आहे. या प्रमाणपत्राच्या कामासाठी खाजगी संस्थांकडून अनेक बनावट संकेतस्थळ तयार करून सामान्यांकडून मनमानी शुल्क वसूल केली जात आहे. या फसवणुकीला टाळण्यासाठी ठाणेजिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच बैठक घेण्यात आली. त्यात जन्म,मृत्यूच्या नाेंदणीसाठी जिल्हा परिषदेने याेग्य पावले उचलण्याची गरज आहे, तसेच बनावट, फसव्या संकेतस्थळाकडून फसवणूक होणार नाही, यासाठी शासनाचे crsorgi.gov.in हे संकेतस्थळ लाभार्थांनी वापरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या जन्म, मृत्यू नोंदणी समितीच्या सभेसाठी जिल्हाधिका-यांसह जि.पत्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आदींची उपस्थिती हाेती. जन्म, मृत्यू नोंदणी बाबत केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकावर चर्चा झाली. या महत्वाच्या कामासाठी व सामान्य नागरिकांपर्यंतही माहिती पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने योग्य पावलं उचलण्याची अपेक्षा जिल्हाधिका-यांनी केली.

या बैठकीत देशात काही ठिकाणी जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे बनावट फसवी संकेत स्थळ तयार करून त्यावरून जन्म मृत्यू प्रमाणपत्र संबंधीताना दिली जात आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेचे फसवणूक करणे सुरू आहे, असे दस्तरखुद्द केंद्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. तर अनेक सार्वजनिक माध्यमातून जन्म मृत्यू प्रमाणपत्राचे वाटपाबाबत लोकांमध्ये अफवा पसरवली जात आहे. खाजगी संस्थांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र कामकाजाची इतर संकेतस्थळ तयार केली आहे. सर्व सामान्य जनतेकडून मोबदला किंवा फी वसूल करून सदर प्रमाणपत्र अदा केली जात आहेत.CRSORGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATHONLINE.COM ह्या संकेतस्थळावरून फसवे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. नागरिकांनी या संकेतस्थळांचा वापर करू नये म्हणून आवाहनाचे सूचना फलक दर्शनी भागात लावण्याबाबत निबंधकांना कळविण्यात आल्याचे या बैठकीत उघड झाले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक यांनी कारागृहात जन्म झालेल्या बालक-बालिका यांचे जन्म नोंदवही मध्ये जन्मस्थान कारागृह अथवा तुरुंग असे नमूद न करता ज्या कारागृह अथवा तुरुंग जन्म झाला आहे त्या शहराचे व गावाचे नाव नमूद करावे आदी विषय यावेळी चचेर्ला घेण्यात आले. 

 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी