मीरा रोड : महापालिकेने जूनमध्ये आदेश देऊनही कंत्राटदाराने परिवहनसेवा सुरू केली नाही. आता केवळ पाच बस त्याही केवळ भार्इंदर पश्चिम भागात सुरू केल्या आहेत. त्यामुळे कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून मुंबई, ठाणे महापालिकांप्रमाणे मीरा-भाईंदर महापालिकेनेही स्वत:च परिवहनसेवा चालवावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेने परिवहनसेवा चालवण्यासाठी मेसर्स भागीरथी एमबीएमटी या कंत्राटदारास कंत्राट दिले आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि परराज्यांतील नागरिकांना रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यासाठी बससेवा चालवली होती. त्या काळातही विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावून बहुतांश कर्मचाऱ्यांना डावलले होते.आयुक्त व महापालिकेने सातत्याने आदेश देऊनही कंत्राटदाराने बससेवा सुरू केली नाही, याचा अर्थ तो पालिकेला जुमानत नाही, हे स्पष्ट आहे. कंत्राटदाराकडे जे चालक, वाहक व इतर कर्मचारी कंत्राटावर काम करीत आहेत, त्याच कामगारांना पालिकेने कंत्राटी कामगार म्हणून पालिकेमध्ये सेवेत घ्यावे.>... अन्यथा आंदोलन करुमहापालिकेने स्वत: ही सेवा चालविल्यास त्यावर पालिकेचे नियंत्रण राहील. त्यासाठी शिवसेनेची कामगार संघटना आपल्याला सहकार्य करेल, असे सरनाईक यांनी आयुक्तांना सांगितले आहे. जर १० दिवसांत सेवा सुरू झाली नाही तर आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.
भाईंदर पालिकेनेच परिवहनसेवा चालवावी- प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:13 AM