शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

शुद्ध पाण्याकरिता ‘भगीरथ’ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:51 AM

मुरबाडच्या कासगावातील लोकसहभाग; ५० पैशांत मिळतेय एक लीटर शुद्ध पाणी

- पंकज रोडेकर ठाणे : मुरबाड तालुक्यातील कासगावाने लोकसहभागातून शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला असून अवघ्या ५० पैशांमध्ये एक लीटर शुद्ध पाणी दिल्याने एक हजार लोकवस्तीच्या या गावातील साथीच्या आजारांवर नियंत्रण आले आहे.कामानिमित्त शहरी भागात राहताना येथील तरुणांनी शुद्ध पाण्याचे महत्त्व जाणले. गावाच्या मातीशी असलेले अतूट नाते जपून शहरी भागाप्रमाणे आपल्या गावकऱ्यांना शुद्ध पाणी पिता यावे, म्हणून गावातील ‘पाडवा मित्र मंडळा’ने शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला आहे.कासगावाने आजूबाजूच्या गावांना एक रुपयात एक लीटर शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याने आजूबाजूच्या गावांमधील अनारोग्य दूर होण्यास हातभार लागला आहे. पाण्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अशुद्ध पाणी वाया न घालवता ते ठिबक सिंचनाद्वारे ५० झाडांसाठी वापरून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा बहुमोल संदेश दिला आहे.मुरबाड शहरापासून २० किलोमीटर अंतरावर सरळगावनजीक कासगाव आहे. या गावाने ठाणे जिल्ह्याला तब्बल १९ तलाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना मुख्याध्यापक दिलेले आहेत. तसेच एसटी महामंडळातही या गावातील सुपुत्र कार्यरत आहेत. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी कधीच झालेली नाही. येथे ग्रामपंचायतीवर बिनविरोध सदस्य निवडून दिले जातात. कासगावात खालची, वरची आणि मधली आळी अशा तीन आळ्या आहेत. या गावातील तरुणवर्ग नोकरीनिमित्त मुंबई, ठाण्याकडे जातो. शेती हाच या गावकºयांचा मूळ व्यवसाय आहे. या गावाला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा होतो. काही वर्षांपासून माजी सिडको संचालक प्रमोद हिंदुराव आणि समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांच्या मदतीने गावकºयांनी लोकसहभागातून गावासाठी पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाण्याची पाइपलाइन पोहोचली. ते पाणी, अंघोळ, कपडे, लादी पुसणे आदी कामांसाठी वापरले जाते.पुरस्कारांचे १६ लाख शिल्लक : या गावाला नुकतेच स्मार्ट व्हिलेज म्हणून गौरवताना १० लाख रुपयांचा पुरस्कार जिल्हा परिषदेने दिला आहे. तालुकास्तरावर स्वच्छता अभियानांतर्गत एक लाख, तर जिल्हास्तरावर पाच लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोकण विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तसेच तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कारातील काही रक्कम या प्रकल्पासाठी खर्च करता येईल का, यासाठी ग्रामसेवकांशी चर्चा करणार असल्याची माहिती गावाचे सरपंच टिकाराम पारध यांनी दिली.महिलांचा पुढाकारशुद्ध पाण्याच्या प्रकल्पामुळे गावकºयांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व समजले आहे. गावाला ग्रामपंचायत, तसेच गावाने उभारलेल्या पाणपोईतून आणि शुद्ध पाण्याच्या प्रकल्पामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. पिण्याकरिता शुद्ध पाणी आणि इतर कामांसाठीही पाणी मिळत असल्याने आता ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी महिलावर्गाकडून होऊ लागलीआहे.रेल्वेस्थानकातील मशीनमुळे सुचली कल्पनाग्रामपंचायतीकडून मिळणाºया पाण्याचा जेथून पुरवठा होतो, त्या ठिकाणी विकास सुरेश यशवंतराव या तरुणाने जाऊन पाहिल्यावर त्याला धक्का बसला. हे पाणी पिणे आरोग्यास घातक असल्याचे त्यांनी सर्व गावकºयांच्या निदर्शनास आणले. ही गोष्ट साधारणत: मार्च महिन्यातील. त्यावर गावकºयांनी तत्काळ मीटिंग बोलवून ग्रामसेवकांशी चर्चा केली व नव्याने सरकारी पाणीयोजना आणण्याची मागणी केली. मात्र, नवी पाणीयोजना येण्यास वेळ लागेल, तोपर्यंत डागडुजी क रू, असे उत्तर ग्रामसेवकाने दिले.धीरज देशमुख नावाचा एक तरुण गावकºयांना शुद्ध पाण्याचे फिल्टर बसवण्यास वारंवार सांगत होता. पण, गावकºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. रेल्वेस्थानकावर माफक दरात मिळणाºया शुद्ध पाण्याच्या धर्तीवर गावासाठी काही करता येईल का, यावर गावकरी विचार करत होते. देशमुख याच्याकडे गावाकरिता शुद्ध पाणी पुरवण्याबाबत गावकºयांनी विचारणा केली. त्याच्या होकारानंतर, पैशांची अडचण उभी राहिली.गावकºयांच्या ‘पाडवा मित्र मंडळा’ने त्यांच्याकडे शिल्लक असलेले दोन लाख रुपये तत्काळ देण्याचा निर्णय घेतला. बाळाराम यशवंतराव यांनी तत्काळ पाण्याची मोटार दिली, तर कृष्णा रामचंद्र यशवंतराव यांनी बोअरवेल करून दिली. ही बोअरवेल गावाच्या सीमेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या मंदिरापर्यंत आणण्यासाठी गावकºयांनी ५०० मीटरची पाइपलाइन श्रमदानातून टाकली. त्यामुळे कासगावातील गावकरी आता लोकसहभागातून शुद्ध पाणी पित आहेत.हनुमान मंदिराजवळ शुद्ध पाण्याचे हे मशीन बसलेले आहे. गावकºयांमधील ताराचंद्र दत्तात्रेय चौधरी, मधुकर दाजी यशवंतराव, रमाकांत दत्तात्रेय यशवंतराव, शरद मोरेश्वर यशवंतराव, नंदकुमार विष्णू चौधरी, अशोक तुकाराम यशवंतराव, मनोहर रघुनाथ यशवंतराव, रमेश यशवंत यशवंतराव, अरविंद अनंत यशवंतराव, सुधीर जगन्नाथ चौधरी, मनोज दत्तात्रेय यशवंतराव, हनुमंत यशवंतराव आणि अनिल चौधरी आदी मंडळींनी याकरिता प्रयत्न केले.कॉइन आणि कार्डप्रणाली : गावकºयांच्या पुढाकाराने उभा राहिलेल्या प्रकल्पासाठी कॉइन आणि कार्डप्रणाली कार्यान्वित आहे. गावातील ५० कुटुंबांना कार्डवाटप केले असून ते कार्ड रिफील करावे लागते. त्यातील पैसे संपेपर्यंत ते कार्यान्वित राहणार आहे. या पैशांमधून लाइटबिल, देखभाल खर्च केला जाणार आहे. पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने पिण्यासाठी मोजकेच पाणी देण्याची सवय आता गावकºयांना लागल्याने त्यांना पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे.सध्या दोन हजार लीटर मिळतेयया प्रकल्पांतर्गत, पाच हजार लीटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे, तर शुद्ध पाण्यासाठी दोन हजार लीटरची दुसरी टाकी बसवली आहे. साधारणत: गावकºयांना दिवसाला ५०० लीटर शुद्ध पाणी पिण्यासाठी पुरेसे पडते. त्यामुळे दीड हजार लीटर पाणी शिल्लक राहत असल्याने आजूबाजूच्या गावकºयांना एक रुपया लीटरने ते देण्यास सुरुवात केली आहे. तर, यातून वितरित होणाºया पाण्याचा हिशेबही एका नोंदवहीत ठेवला जात आहे.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे