शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

शिवसेनेकडून भक्ती शक्ती संवाद यात्रा ; हिंदुत्वाचा जागर महाराष्ट्र भर !

By अजित मांडके | Published: December 18, 2023 10:46 AM

स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंदजी दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर पाऊल टाकत अध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेची निर्मिती केली.  

अजित मांडके 

 ठाणे : स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंदजी दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर पाऊल टाकत अध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेची निर्मिती केली.  महाराष्ट्रातील नानाविध भक्ती पंथ , तीर्थक्षेत्र व अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार व निरुपणकार, गावोगावी असणारे भजन मंडळ या सोबत शक्तीचा अर्थात हिंदुत्वासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सकल शिव शंभो विचारांना समाजा पर्यंत नेणाऱ्या तमाम युवक, गोरक्षक व ज्येष्ठांशी संवाद साधण्यासाठी धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या भक्ती शक्ती संवाद यात्रा माध्यमातून महाराष्ट्रभर ३६ जिल्ह्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या  मार्गदर्शनाने  प्रवास करणार आहेत.

प्रत्येक दिवसाची सांगता हजारो लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाने होणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत विविध पंथांचे प्रचारक व संत वंशज देखील असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र,  उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकण अशा पाच टप्प्यात ही संवाद यात्रा होईल. संवाद यात्रेसाठी शिवसेना सचिव संजय मोरे व माध्यम समन्व्यक दिनेश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले असे भोसले यांनी संवाद साधताना नमूद केले. 

अध्यात्मिक क्षेत्रासाठी असा उपक्रम प्रथमच महाराष्ट्रात होत असल्याने अध्यात्मिक क्षेत्रातून देखील मोठ्या प्रमाणात याचे स्वागत केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व साधू संतांविषयी असणारा उत्कट जिव्हाळा व श्रद्धा या माध्यमातून दिसून येते. संतांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच संतांजवळ गेले पाहिजे हा संदेश यातून त्यांनी समाजाला दिला आहे. राजसत्ता व धर्मसत्ता जेव्हा सोबत प्रवास करते तेव्हा निश्चित रामराज्य निर्माण होते. शिंदे यांच्या नेतृत्वातील रामराज्य महाराष्ट्र पाहत आहे.

 - अक्षयमहाराज भोसले प्रदेशाध्यक्ष , शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना