शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

भार्इंदरची दंगल होणार बंद?

By admin | Published: January 24, 2017 5:38 AM

‘भार्इंदरमध्ये खेळायचे कुठे? हाच प्रश्न आहे’ या मथळ्याखाली खेळाबद्दलची अनास्था दर्शविणारे वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये

भार्इंदर : ‘भार्इंदरमध्ये खेळायचे कुठे? हाच प्रश्न आहे’ या मथळ्याखाली खेळाबद्दलची अनास्था दर्शविणारे वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये विश्लेषण प्रसिद्ध झाले असतानाच पालिकेच्या मालमत्ता विभागाने कुस्तीच्या आखाड्याला जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे शहरात टिकलेली दंगल बंद होते की काय, असा प्रश्न कुस्तीपटूंना पडला आहे.मीरा-भाईंदर पालिकेच्या मालमत्ता विभागाने भार्इंदर पश्चिमेकडील समाजमंदिरात चार वर्षांपासून सुरु असलेला एकमेव दंगल आखाडा रिकामा करण्याची नोटीस भार्इंदर कुस्तीगीर संघाला धाडली आहे. यामुळे कुस्तीपटूंत कमालीची नाराजी पसरली आहे. संघातील सदस्य, दानशूर व्यक्ती व कुस्तीपटूंच्या पालकांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने हा आखाडा चालवला जातो. कुस्ती टिकविण्यासाठी संघाची धडपड चालू आहे. तेथे कुस्तीपटूंना मोफत प्रशिक्षण दिले जाते. आखाड्यात कुस्तीसाठी लागणारी माती शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यासाठी दर सहा महिन्याला सुमारे १० हजारांचा खर्च येतो. मॅटवरील कुस्तीचा प्रकार मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. मात्र कुस्तीपटूंना मॅटवरील कुस्तीचे धडे देण्यासाठी संघाकडे मॅटच नाही. मॅटची किंमत सहा लाखांहून अधिक आहे. त्याच्या देणग्यांसाठी संघाचा पाठपुरावा सुरु आहे. त्यातील सुमारे साडेतीन लाखांची मदत आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे. आखाड्याचा महिन्याचा खर्च माजी खासदार संजीव नाईक यांच्या देणगीतून भागविण्यात येत आहे. पालिकेने कुस्ती प्रशिक्षणासाठी समाजमंदिराची जागा वार्षिक एक हजार १०० रुपये भाडे कराराने संघाला दिली. ते भाडे न थकविता उलट चुकवावे आणि हा एकमेव कुस्ती आखाडा टिकवून ठेवण्यासाठी संघाची धडपड सुरु आहे, त्याचवेळी दुसरीकडे पालिकेने जागा रिकामी करण्याची नोटीस पाठविल्याने कुस्तीचे काय होणार, अशी चिंता कुस्तीपटूंना लागली आहे. (प्रतिनिधी)