डोंबिवली : गेली अनेक वर्षे बंद असलेल्या सूतिकागृहाचे तातडीने नूतनीकरण करून ते नागरिकांसाठी खुले करावे, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे शुक्रवारी येथील पूर्वेकडील इंदिरा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच भाषणेही ठोकली. परंतु, धरणे आंदोलनाला रामनगर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने केवळ निदर्शने करून अर्ध्या तासातच पदाधिकाºयांना आंदोलन आटोपते घ्यावे लागले.
पूर्वेतील टिळक रोडवरील ४१ वर्षे जुने असलेल्या सूतिकागृहाच्या छताचे २०१३ मध्ये प्लास्टर कोसळले होते. तेव्हापासून सूतिकागृह बंद आहे. तेथील कारभार पश्चिमेतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रु ग्णालयात हलवण्यात आला. तेथे गर्भवती महिलांच्या बाळंतपणाची सुविधा, तर लसीकरणाची सुविधा पूर्वेकडील पंचायत विहीर आणि मढवी शाळेसमोरील आरोग्य केंद्रात करण्यात आली. मात्र, या स्थलांतरामुळे गर्भवती महिलांची परवड होत आहे. सूतिकागृहाच्या वास्तूचे नूतनीकरण तातडीने होणे आवश्यक होते. परंतु, महापालिका प्रशासनासह सत्ताधाºयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे, हे वास्तव आहे. प्रशासन आणि सत्ताधाºयांच्या उदासीन कारभाराचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या डोंबिवली शहर कमिटीतर्फे धरणे आंदोलन छेडण्यात येणार होते. परंतु, रामनगर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने महासंघाने महापालिकेविरोधात केवळ निदर्शने करावी लागली. इंदिरा चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथील चौकातच निदर्शने केली. सूतिकागृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. डिसेंबर २०१६ मध्ये मोर्चा काढून राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती, याकडेही महासंघाच्या पदाधिकाºयांनी लक्ष वेधले. केडीएमसी अधिकारी आणि महापौरांविरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलनकर्ते ताब्यातभारिपने धरणे आंदोलनाची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. परंतु, ती नाकारण्यात आली. परवानगीशिवाय आंदोलन करणाºया पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर काही वेळाने सर्वांना सोडून देण्यात आले.