ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भास्करराव मुंडले (वय ८८) यांचे मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या ठाण्यातील मुलीच्या घरी निधन झाले. मुंबई महानगरातील संघकामाची रुजवात करणाऱ्या कार्यकर्त्यांत मुंडले यांचे महत्त्वाचे योगदान होते. आणीबाणीच्या काळात संघावरील बंदीमुळे १९ महिने ते मिसाबंदी होते. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचेही काम केले. रामजन्मभूमी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. मृत्यूनंतर देहदानाची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी रु ग्णालयात सोपवण्यात आला. यावेळी त्यांची कन्या राधा भिडे, जावई राजीव भिडे, नात, संघाचे व विश्व हिंदू परिषदेचे मुकेश पाध्ये, सुधाकर बारसोडे, आनंदराव भागवत, विक्र म भोईर आदी उपस्थित होते.
स्वयंसेवक भास्करराव मुंडले यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:43 AM