भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरण शुक्रवारी भरून वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तालुक्यातील तानसा व मोडकसागर ही धरणे याआधीच भरून वाहू लागली आहेत. गेल्या काही दिवसंपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे.जुलै, आॅगस्ट महिन्यांचे काही दिवस कडक उन्हाचे गेल्याने यावर्षी धरणे भरणार का, शेती करता येईल की नाही, याची चिंता सतावत होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. भातसा धरण क्र मांक-१ चे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी आमदार दौलत दरोडा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय निमसे, मनोज विशे यांच्या उपस्थितीत गेट उचलले.पाच दरवाजे असणाऱ्या या धरणाची भरून वाहण्याची पातळी ही १४२ मीटर असून आजची पाणीपातळी १३९.८० असून पाण्याचा अंदाज घेऊन धरणाचे तीन दरवाजे २५ सेंटीमीटरने वर उचलले. या धरणाच्या नदीपात्राजवळ असणाºया गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
भातसा धरण झाले ओव्हरफ्लो, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 3:13 AM