ठाणे - मीरा-भाईंदर भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे आज सायंकाळच्या सुमारास भाईंदर पूर्वेला खारीगाव नाक्यावर असलेली एक साई आशीर्वाद नावाची चार मजली धोकादायक इमारत कोसळली. ही इमारत 35 वर्ष जुनी होती. इमारत आधीच रिकामी केलेली असल्याने सुदैवाने यात कोणती जीवित हानी झाली नाही. मात्र, इमारतीच्या काही भिंती उभ्याच असल्याने आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे.
खारीगाव नाका येथे असलेली ही चार मजली इमारत 1985 सालातील म्हणजेच साधारणपणे 35 वर्ष जुनी होती. पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून रिकामीही केली होती. गेले दोन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस व वारा असल्याने या इमारतीची आजूबाजूच्या रहिवाश्याना धास्ती वाटत होती.
इमारत कोसळली तेव्हा प्रचंड आवाज झाला. एवढेच नाही, तर जवळच्या इमारतींनाही हादरा बसला. यामुळे रहिवासी भयभीत झाले होते. खारीगाव नाका हा नेहमी वर्दळीचा असतो. सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही .
या इमारतीचा आतील भाग कोसळला असला तरी बाजूच्या भिंती मात्र उभ्याच आहेत. त्या केव्हाही कोसळू शकतात, अशी शक्यता नगरसेवक धनेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच बाजूच्या इमारती आणि त्यातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी राहिलेली इमारत त्वरित पडावी अशी मागणीही त्यांनी पालिकेला केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
मुंबईत मुसळधार, कोविड स्पेशल जेजे रुग्णालयात घुसलं पाणी; आदित्य ठाकरेंचं घरातच थांबण्याचं आवाहन
मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...