शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

पेट्रोलकांडातील बहादूरसिंगला अटक

By admin | Published: January 04, 2016 1:58 AM

बारबाला पत्नी तानिया सह तिची भाची शुकीला शेख ह्यांना पेट्रोल ओतून जाळणारा फरार बहाद्दूरसिंग परमार याला अखेर मीरारोड पोलिसांनी राजस्थानच्या माउंट आबू रोड येथून अटक केली

मीरा रोड : बारबाला पत्नी तानिया सह तिची भाची शुकीला शेख ह्यांना पेट्रोल ओतून जाळणारा फरार बहाद्दूरसिंग परमार याला अखेर मीरारोड पोलिसांनी राजस्थानच्या माउंट आबू रोड येथून अटक केली . तानियाने फ्लॅटसाठी लावलेला तगादा व तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय यातून बहाद्दूरने तिला जाळून मारल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे . गुरु वारी ( दि . ३१ डिसेंबर ) पहाटे मीरा रोड हबटाऊन गार्डेनीया मधील ५०१ क्र . च्या सदनिकेत बहाद्दूरने पत्नी तानिया, १३ महिन्यांचा मुलगा जयदेव व तानियाची भाची शुकीला यांना पेट्रोल ओतून जाळले होते . त्यात तानिया व शुकीलाचा मृत्यू झाला. जयदेव सुदैवाने बचावला . या पेट्रोलकांडामुळे सर्वच हादरले . उपअधीक्षक सुहास बावचे व वरिष्ठ निरीक्षक जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यवान कदम , महेश कुचेकर आदींची पथके फरार बहाद्दूरच्या शोधासाठी रवाना झाली . शनिवारी रात्री बहाद्दूरला माउंट आबू रोडवरून उपनिरीक्षक कुचेकर व पोलिस नाईक ब्राह्मणे यांच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले . पेट्रोलकांडात बहाद्दूरचे हात व चेहरा भाजला आहे . रखवालदार व रहिवाशांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने जयदेव बचावला. शुकीयाचे जागीच निधन झाले तर तानियाचा इस्पितळात मृत्यू झाला. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज व भाडेकरू म्हणून पोलीस पडताळणी केलेली असल्याने आरोपी बहादूर असल्याची ओळख पटली . सोसायटीचे अध्यक्ष विवेक मने यांनी बहाद्दूरच्या खारदांडा येथील अंबिका ज्वेलर्सचे कार्ड घेऊन ठेवल्याने पोलिसांना बहाद्दूर चे खारदांडा येथील घरापर्यंत पोहचणे सोपे झाले . बहाद्दूरची ओळख व पत्ता सापडल्याने पोलिसांनी त्याचे खारदांडा येथील घर गाठले . काही दिवसांपासून तो घरी आला नसल्याचे समजले . शाळेला सुट्टी असल्याने त्याची पत्नी मुलांना घेऊन नालासोपारा येथे माहेरी गेली होती . पोलिसांनी त्याच्या पत्नीला गाठून चौकशी केली . राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील चारभूजाजवळ पिपलांत्री हे गाव असल्याचे व त्याची अल्टो गाडी सोबत असल्याचे पोलिसांना समजले . गाडीचा नंबर मिळताच महामार्गावरील टोल नाक्यांवरून माहिती घेत घेत पोलीस पथक थेट चारभूजा शहरापर्यंत पोहचले. तेथील टोलनाक्यावरून बहाद्दूरची अल्टो पार झाली नव्हती . तोच बहादूर फालना येथील लांबच्या नातलगांकडे आश्रय घेण्याच्या प्रयत्नात होता . परंतु पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे त्याच्या नातलग, मित्रांना समजले होते . त्याच्या मागावर असलेल्या कुचेकर यांच्या पथकाने त्याला माउंट आबू रोड वरच तो एका ठिकाणी थांबलेला असतानाच धरले .