ठाणे : बुलेट ट्रेनसाठी भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर शेतजमीन लागणार आहे. तिच्या संयुक्त मोजणीस शेतकऱ्यांनी एकमुखी संमती दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यासाठी प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्या दालनात शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बुधवारी पार पडली. त्यात शेतकºयांनी जमीनमोजणीस होकार दिल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
एक वर्षाहून अधिक कालावधी उलटला, तरी जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी एक इंचही भूसंपादन झाले नाही. त्यास वेग यावा, यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काही महिन्यांपासून शेतकरी व जिल्हा प्रशासनास हिरवा कंदील दाखवल्याने भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर जमिनीची मोजणी होण्याचा मार्ग सुकर झाला. एकंदरीत, १३१ खातेदार शेतकºयांना पूर्ण विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल, असे डॉ. नळदकर यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनसाठी लागणाºया शेतजमिनीसाठी अंजूर, भरोडी, हायवे दिवे येथील शेतकºयांनी विरोध दर्शवला होता. त्यावर तोडगा निघावा, यासाठी मोहन नळदकर व शेतकरी संघटनेचे अॅड. भारद्वाज चौधरी, हिरा पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरू होती. शेतकºयांनी काही अटी कायम ठेवून संयुक्त जमीन मोजणीस होकार दिला. यामुळे १७ ते १९ जानेवारीदरम्यान अंजूर, भरोडी, हायवे दिवे येथील १२९ खातेधारक शेतकºयांच्या ६०.६४ हेक्टर जमिनीच्या मोजणीचे नियोजन निश्चित केले आहे. या बैठकीला हायस्पीड ट्रेनचे नायक, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद ठुबे आदींची देखील उपस्थिती होती.या अटींना मान्यताबाधित शेतकºयांना मोबदला ठरवण्यासाठी नेमलेल्या शासकीय समितीत प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा प्रतिनिधी नेमावा, बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडला भरोडी ते म्हातार्डी, डोंबिवली यांना जोडणारा सर्व्हिस पूल द्यावा. तसेच प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी सुरई, भरोडी व अंजूर या भागांत कारशेड प्रस्तावित आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना केवळ मजूर म्हणून नोकरी न देता त्यांना कौशल्यकामाची नोकरी द्यावी, या मागण्या मान्य केल्या आहेत.