शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भार्इंदरची परिवहनसेवा खिळखिळी, ५८ पैकी केवळ ३२ बसच रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:14 AM

अत्यावश्यक सेवा असूनही मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहनसेवेची सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. सध्या ५८ पैकी अवघ्या ३२ बसच रस्त्यावर धावत असून तब्ब्ल २६ बस टायर नाही, इंजीनमध्ये बिघाड, देखभाल नाही आदी विविध कारणांनी बंद पडलेल्या आहेत.

- धीरज परबमीरा रोड : अत्यावश्यक सेवा असूनही मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहनसेवेची सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. सध्या ५८ पैकी अवघ्या ३२ बसच रस्त्यावर धावत असून तब्ब्ल २६ बस टायर नाही, इंजीनमध्ये बिघाड, देखभाल नाही आदी विविध कारणांनी बंद पडलेल्या आहेत. टायर, दुरुस्तीच्या कामांचे पैसे देण्यास वा आधीची थकबाकी असल्याने ही नामुश्की ओढवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याचा परिणाम परिवहनसेवेवर होऊन प्रवासी त्रासले आहेत. गंभीर बाब म्हणजे पावसाळा सुरू झाला असताना बसचे वायपर बंद आहेत.आघाडी सरकारच्या काळात मीरा-भार्इंदर महापालिकेस ५० बस अनुदानावर मिळाल्या होत्या. त्या काही वर्षांतच भंगारात निघाल्या. नंतर, पुन्हा काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत महापालिकेस तब्ब्ल १०० बस मोफत मिळाल्या. अनेक बसेसचा खुळखुळा झाला आहे. टायर नाही, कधी इंधनासाठी पैसे नाहीत, अशा कारणांनी परिवहनसेवा ठप्प होत आहे.सध्या ५८ बस आहेत. त्यात व्हॉल्वो एसी बसचाही समावेश आहे. सध्या ३२ बसच रस्त्यावर धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच आता शाळा, महाविद्यालये सुरू होणार असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. बस नसल्यास प्रवाशांना नाइलाजाने रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.सध्या प्लेझंट पार्कयेथील आगारात नादुरु स्त बस उभ्या आहेत. खराब झालेले टायर रांगेने लावलेले आहेत. टायर खरेदीअभावी सुमारे २२ बस बंद आहेत. याआधीही ढिसाळपणामुळे टायरखरेदी होत नव्हती. आताही टायरखरेदीसाठी पैसे दिले जात नसल्याने वितरकाने नवीन टायर देणे बंद केले आहे.निधीच देत नाहीबसच्या देखभाल दुरु स्तीसाठी पालिकेने सत्यम मोटार्स, ओम मोटार्स, कमल मोटार्स या तिघांना विभागून कामे दिली आहेत. परंतु, कामाचा मोबदला व लागणाऱ्या सुट्या भागांचे पैसेच पालिका रखडवत असल्याने त्याचा विपरित परिणाम देखभालीवर झालेला आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभाराचा फटका मीरा-भाईंदरमधील सामान्य प्रवाशांना विनाकारण सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.परिवहन ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे आवश्यकता पडल्यास प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जातो. टायर, देखभाल दुरु स्ती वा अन्य आवश्यक बाबींसाठी आपल्याकडे देयक देण्याची प्रकरणे आली, तर ती लगेच मंजूर केली जातात. पालिकेकडे त्यासाठी निधी आहे.- शरद बेलवटे, मुख्य लेखाधिकारीसध्या ३६ बस या प्रवाशांच्या सेवेत सुरू आहेत. बाकीच्या बस देखभाल-दुरु स्तीसाठी बंद आहेत. येत्या दोन ते चार दिवसांत प्रलंबित देयकांचा प्रश्न व दुरु स्ती आदी कामे मार्गी लागतील.- स्वाती देशपांडे, उपव्यवस्थापक, परिवहनआमच्या प्रभागात बससेवेची समस्या नाही. मीरा रोड ते ग्रीन व्हिलेज-वेस्टर्न पार्कअशी पालिकेची बससेवा नियमित सुरू आहे.- सचिन म्हात्रे, नगरसेवकमुर्धा ते उत्तन व पाली- चौक भागातील प्रवासी हे पालिकेच्या बससेवेवर अवलंबून असतात. पालिकेला मोठा फायदाही होतो. तरीही या भागातील नागरिकांना चांगली सेवा मिळत नाही. बसच्या फेºया कमी असून वेळेवर बस येत नाहीत. सेवा ठप्प झाली आहे. परिवहनसेवेचा बोजवारा उडाला आहे.- शर्मिला बगाजी, नगरसेविका

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक