शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भार्इंदर पालिका : भाजपाचा पारदर्शक कारभार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 3:46 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याची मंजुरी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विशेष महासभेत दिली.

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याची मंजुरी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विशेष महासभेत दिली. मात्र, वाढीव दरवसुली पालिकेने जानेवारीपासूनच चालवल्याने तब्ब्ल ३६ हजार ४१८ खातेदार नागरिकांना काही कोटींचा भुर्दंड बसला आहे. वाढीव पाण्याची बिले पाहून नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सभापती ध्रुवकिशोर पाटील व भाजपा सदस्यांनी बहुमताने दरवाढीस मंजुरी दिली होती. नागरिकांवर नव्याने आठ टक्के पाणीपुरवठा लाभकर, पाच टक्के मलप्रवाहकर व घरांना एक रु पया चौरस फुटाने, तर वाणिज्य आस्थापनांना जादा दराने घनकचरा शुल्क आकारणीसह पाणीपट्टीत तीन ते दहा रुपयांची वाढ तसेच मालमत्ताकर योग्य भाडेमूल्यदरातही ५० टक्के वाढ करण्याचे बहुमताने मंजूर केले होते.या अवास्तव दरवाढीला शिवसेना, मनसे, काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. शिवाय, भाजपाच्या काही नगरसेवकांनीही करवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे २० फेब्रुवारीच्या महासभेत सत्ताधारी भाजपाने थोडी माघार घेत पाणीपट्टीत निवासीसाठी तीन रु पये, तर वाणिज्यवापरासाठी १० रु पये अशी प्रतिहजार लीटरसाठी वाढ केली. घनकचरा शुल्क घरासाठी एक रु पया प्रतिचौरस फूट, तर अन्य वाणिज्य संस्थांना वेगवेगळे दर मंजूर केले. शिवाय, नव्याने होणाऱ्या मालमत्तेवरही ५० टक्कयांपर्यंत करवाढ मंजूर केली होती. वास्तविक, दोन वर्षांआधीही सत्ताधाºयांनी पाणीपट्टी सात रुपयांवरून १० रुपये केली होती.पाणीपुरवठा विभागाचे ३६ हजार ४१८ खातेदार आहेत. त्यांना दर चार महिन्यांनी बिले पाठवली जातात. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांचे पाण्याचे आलेले बिल पाहून नागरिकांच्या चेहºयावरचा रंग उडाला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांच्या बिलात व जानेवारी ते एप्रिल २०१८ या चार महिन्यांच्या बिलात तब्बल अडीच ते सात हजार रुपये जास्त आले आहेत.मीटर बंद असल्यास सरासरी आकारले जाणारे बिलही अव्वाच्या सव्वा आहे. चालू मीटरच्या रीडिंगप्रमाणे त्यात १० टक्के वाढ करून बंद मीटरचे सरासरी बिल देणे अपेक्षित असताना त्यातही मनमानी वसुली सुरू आहे. भार्इंदर पश्चिमेच्या शमाइल कॉम्प्लेक्सचे पदाधिकारी तसेच भाजपा कार्यकर्ते आदेश अग्रवाल यांनी सांगितले की, आमच्या संकुलासनऊ नळजोडण्या आहेत. डिसेंबरपर्यंतचे बिल ७५ हजार होते. पण, जानेवारी ते एप्रिलचे बिल तब्बल ९७ हजार रुपये आले आहे.सरासरी बिलही मनमानीपणे लावले जात आहे.सत्ताधारी, प्रशासनाच्या संगनमतातून सर्वसामान्यांची लूटविरोधी पक्षनेते राजू भोईर यांनी मात्र सत्ताधारी भाजपा व प्रशासनाने संगनमतानेच ही लूट चालवली असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांनी तक्र ारी केल्यानंतर आता हे उलट्या बोंबा मारत आहेत. भाजपाचे नेते व नगरसेवकांनीच नागरिकांवर कराचे ओझे लादायचे आणि बळजबरी लूट करायची. वरून आपण नागरिकांसोबत असल्याचा कांगावा करायचा, हे लाजिरवाणे असल्याची टीका केली आहे.व्याजासह पैसे परत करा : माजी महापौर गीता जैन यांनी वाढीव बिले रद्द करून सुधारित बिले द्या व नागरिकांनी भरलेले पैसे व्याजासह परत करा, अशी मागणी केली. रोहिदास पाटील यांनीही अधिकाºयांवर कारवाईची मागणी करत सरासरी बिलाची मनमानी वसुलीही रद्द करा, असे सांगितले.वाढीव दराने वसुलीची कबुली : पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी जानेवारीपासून वाढीव दराने नागरिकांना पाणीपट्टीआकारणी केली असल्याचे मान्य करत पुढील बिलांमध्ये ते कमी करून देऊ, असे सांगितले.सत्ताधारी व पालिका प्रशासनानेच नागरिकांवर करवाढ लादून आणखी त्यांची बेकायदा लूट चालवणे गंभीर आहे. याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक जाब विचारतील. करवाढ रद्द करून नागरिकांच्या लुटीतून वसूल केलेले पैसे त्यांना परत करा, अशी मागणी गटनेते जुबेर इनामदार यांनी केली आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकnewsबातम्या