भिवंडी: शहरातील बस स्थानकातील आवारात बांधण्यात आलेल्या पाणपोईची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून कित्येक वर्षा पासून हि पाणपोई धूळ खात पडून बंद पडली आहे. काही नळाच्या तोटी ही तुटलेल्या अवस्थेत आहे.त्यातच आता उन्हाळ्याच्या झळा वाढल्या असताना भिवंडी बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरीक व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणा वर हाल सुरू झाले आहेत. बस आगार प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभाराचा नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भिवंडी बस स्थानकात शहरा बाहेरून मोठ्या प्रमाणावर बस येत असून त्यातून शेकडो प्रवासी भिवंडी शहरात येत असतात.तर ग्रामीण भागात सुध्दा जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवन करावी लागत असून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे.त्यामुळे गरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.व बस आगारातील अधिकाऱ्यांनी व प्रशासनानी याकडे लक्ष द्यावा अशी मागणी नागरिक करत आहे. पाणपोई दुरूस्ती बाबतचा प्रस्ताव ठाणे विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून तात्काळ पाणपोई सुरू करण्या बाबत कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती बस स्थानक व्यवस्थापक इम्रान पटेल यांनी दिली आहे.
भिवंडी बस स्थानकातील पाणपोई धूळ खात ; प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय
By नितीन पंडित | Published: March 26, 2024 4:59 PM