नितिन पंडीत
भिवंडी: आदिवासी संस्कृती टिकली पाहिजे तसेच दिवाळी निमित्त अडवासी बांधवांची दिवाळी देखील गोड व आनंदात झाली पाहिजे या हेतूने विजेता विचार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शामकांत नवाळे यांच्या वतीने तालुक्यातील पारिवली जुलाई पाडा येथे पारंपरिक आदिवासी दिवाळी मोहत्सव बुधवारी सायंकाळी उशिरा पार पडला . या कार्यक्रमाला शहरातील दानशूर व्यक्तींसोबत, सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
या महोत्सवात आदिवासी बांधवांचा पारंपारिक तारफा नृत्य सादर करून दिपोत्सव करण्यात आला. त्यांनतर आदिवासी पाड्यातील सुमारे १०४ महिलांना साडी, लुगडी, मिठाई आणि फराळ वाटप करण्यात आले. यावेळी विजेता विचार फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
रमेश म्हसकर, अलंकार वारघडे, धीरज भोईर, अशोक ठाणगे, लक्ष्मण ठाकूर,जयश्री वाघ, डॉ. नरेंद्र जैन आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विद्यार्थिनी संस्कृती म्हात्रे हिला आदर्श वक्ता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जायंट्स व सहेली ग्रुप अध्यक्षा अलका जैन, काटई ग्राम पंचायत सरपंच अलका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कवी माधव गुरव आणि कवी मिलिंद जाधव यांनी आदिवासी जीवनावर कविता सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण दांडेकर परिवार आणि युवा मित्र मंडळ कार्यकर्ते जुलाईपाडा यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमचे नियोजन व सूत्रसंचालन विजेता विचार फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष शामकांत नवाले यांनी केले.