शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

भिवंडीतील कचरा घंटागाडी संपावर, नगरसेवकाने कचरा फेकला मुख्यालय प्रवेशद्वारावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 5:21 PM

काँग्रेस नगरसेवक फहाद बाबा बाउद्दीन यांनी बुधवारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह येत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकून आपला संताप व्यक्त केला आहे.

नितीन पंडित

भिवंडी - भिवंडी शहरातील कचरा उचलण्याचे काम खासगी घंटागाडी ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात येत असून, त्यांचे फेब्रुवारीपासूनचे देयक बिले महानगरपालिका प्रशासनाने न दिल्याने त्रस्त खासगी घंटागाडी ठेकेदारांनी मंगळवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन सुरू केल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहिल्याने संतप्त काँग्रेस नगरसेवक फहाद बाबा बाउद्दीन यांनी बुधवारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह येत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकून आपला संताप व्यक्त केला आहे.

भिवंडी शहरात मागील 2014 पासून शहरात दररोज जमा होणारे सुमारे 400 मेट्रिक टन कचरा उचलण्याचे काम खासगी वाहन ठेकेदारांनी पुरविलेल्या घंटागाडी मार्फत करण्यात येत असून , त्यांना फेब्रुवारी 2020 पासून तब्बल पाच महिन्याचे पैसे महानगरपालिका प्रशासनाने न दिल्याने या ठेकेदारांनी बुधवारी सकाळ पासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहिला आहे.शहरातील कचरा उचलण्यासाठी तब्बल 93 घंटागाडी 15 जेसीबी व 49 डंपर हे भाडे तत्वावर पुरविण्यात आले असून यांना 2010 च्या जिळ दरपत्रक सूचनेनुसार घंटागाडीस प्रतिदिन 1197 तर त्यावरील कामगारास अवघे 297 रुपये मेहनताना दिला जात असून तुटपुंज्या मानधनात आम्ही काम करीत असताना सध्याच्या कोरोना संकट काळात ही आमच्या कामगारांनी जीव धोक्यात घालून सेवा बजावली असताना व घाण कचरा व्यवस्थापना साठी चा निधी उपलब्ध असताना वाहन ठेकेदारांची बिले जाणूनबुजून अडवून ठेवली जात असल्याने आम्हाला काम बंद आंदोलन करावे लागले असे वाहन ठेकेदार यांनी नाव न सांगण्याचा अटी वर माहिती दिली.

दरम्यान या घंटागाडी ठेकेदारांकडून मागील कित्येक दिवसांपासून बिला साठी तगादा लावला जात असताना मागे पंधरा दिवसां पूर्वी सुध्दा काम बंद केले होते त्यावेळी मनतमवरी करून काम सुरू करण्यास भाग पाडले परंतु पुन्हा प्रशासन त्यांचे बिल देत नसल्याने त्यांच्या काम बंद आंदोलना मुळे शहरातील कचऱ्याची समस्या जटिल होत असल्याने संतप्त काँग्रेस नगरसेवक फहाद बाबा बाउद्दीन यांनी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर आपल्या सोबत आणलेला कचरा ओतून आपला संताव व्यक्त केला आहे.

घाण कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निधी असताना प्रशासन जाणीवपूर्वक त्यांना पैसे न देण्याने शहरातील नागरिकांना नाहक कचऱ्याच्या दुर्गंधीचा समान करावा लागत असून , कचरा न उचलल्याने नागरीकांना साथी च्या आजारांचा सुध्दा सामना करावा लागू शकतो व सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्ग काळात ते नागरीकांसाठी घटक असल्याने आपण प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी कचरा मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारा फेकला असल्याची महिती काँग्रेस नगरसेवक फहाद बाबा बाउद्दीन यांनी दिली आहे.

दरम्यान दुपारी या समस्येवर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या दालनात झालेल्या चर्चेत घंटागाडी ठेकेदारांना तात्काळ एक महिन्याचे पैसे अदा करून काम सुरू करण्याचे सांगण्यात आले असून, त्यानुसार ठेकेदारांनी काम बंद आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक अशोक संख्ये यांनी दिली आहे.