भिवंडी : महापालिकेची घरपट्टी आणि पाणीपट्टी कराची थकीत रक्कम तब्बल ३८२ कोटी १८ लाख ३१ हजार ९२१ रु पये कर थकबाकी आहे. त्यामुळे शहरात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. कोट्यवधींची थकबाकी वसुली होत नसल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊ न जास्तीत जास्त थकबाकीदारांनी कर भरावे. ही संधी गमावल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आष्टीकर यांनी दिला.
भिवंडी पालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणारे बहुसंख्य व्यावसायिक नागरिक घरपट्टी, पाणीपट्टीचा मालमत्ता कर वेळेवर भरत नसल्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे शहराची अवस्था बकाल झाली आहे. व्यापारी आणि रहिवासी नागरिकांसह कारखानदारकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. मनपाच्या कामचुकार प्रभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे करवसुलीत पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे मनपा आयुक्त आष्टीकर यांनी उपायुक्तांसह अधिकाºयांची बैठक घेऊन चांगलीच खरडपट्टी काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नागरिक, व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर कर थकवला आहे.
प्रभाग समिती क्र मांक १ मध्ये १२९ कोटी ७५ लाख ४० हजार ६६१ रुपये थकबाकी असून प्रभाग समिती क्र मांक २ मध्ये ८१ कोटी ३३ लाख ७३ हजार, प्रभाग समिती ३ मध्ये ७० कोटी ७६ लाख, प्रभाग ४ मध्ये ५७ कोटी ७७ लाख ८९ हजार ५७९ रु पये थकबाकी आहे. प्रभाग समिती ५मध्ये ४२ कोटी ५५ लाख २८ हजार १६१ रुपये अशी एकूण ३८२ कोटी १८ लाख ३१ हजार ९२१ रु पये कर थकबाकी झाली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रभारी उपायुक्त वंदना गुळवे यांच्यासह नऊ कर्मचाºयांचे विशेष पथक नेमले आहे.
अशी आहे अभय योजना
थकबाकीदार करदात्या नागरिकांसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. १० डिसेंबर ते ३१ जानेवारी २०२० पर्यंत थकबाकी भरल्यास १०० टक्के व्याजमाफी दिली जाणार आहे. तर १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत ७५ टक्के, तर १ ते ३१ मार्चपर्यंत कर भरणाºयांना ५० टक्के व्याजमाफी मिळणार आहे. शहरवासीयांसाठी थकीत मालमत्ताकरांचा भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी ही अभय योजना सुरू करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी सांगितले.