- नितीन पंडितभिवंडी - शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढवल्यानंतर भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट, कल्याण नाका, देवजी नगर,पटेल नगर,तांडेल मोहल्ला,कल्याण नाका,कमला हॉटेल आदी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. तीनबत्ती,भाजी मार्केट या ठिकाणी तब्बल दोन फूट पाणी वाढल्याने येथील दुकानांमध्ये पाणी शिरले होते.या सर्वांचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होऊन शहरातील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती. भिवंडी ठाणे या जुन्या रस्त्यावरील कशेळी काल्हेर या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या रस्त्यावर सुमारे दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने असंख्य वाहनांचा वेग मंदावला असून यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना वाहने चालवावी लागत आहेत त्यामुळे अनेक दुचाकी वाहने या पाण्यातून जात असल्याने बंद पडली होती,त्यामुळे दुचाकी चालकांना वाहने पाण्याबाहेर काढून त्यांना सुरू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
Bhiwandi: भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी
By नितीन पंडित | Published: July 13, 2024 7:36 PM