भिवंडी - शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील वारणा व कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील खाडीकिनारी असलेल्या म्हाडा कॉलनी, अजयनगर, अंबिकानगर, बंदर मोहल्ला भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अजयनगर, शिवाजी चौक, शिवाजीनगर मार्केट, नझराना कम्पाउंड, नवीचाळ, तानाजीनगर आदी भागात शिरले. निजामपूर पोलीस ठाण्याच्या चौकीतही पाणी गेले. शिवाजीनगर भाजी मार्केट पाण्याखाली गेल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. एसटी बसस्थानक ते अंजूरफाटा या मार्गावरील गटारे साफ न केल्याने इंदिरा गांधी रुग्णालयाचे प्रवेशद्वार, कल्याण रोड वाहतूक शाखेजवळ, गोपाळनगर, कमला हॉटेल, महेश डाइंग, नारपोली शंकर डाइंग आदी भागात पाणी साचले होते. याच मार्गावरील भिवंडी न्यायालयाच्या आवारात पाणी शिरले. प्रमुख नाल्यांवर नागरिकांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. नाल्यांवर बांधकामे झाल्याने पाणी साचण्याच्या घटना वाढल्या.कल्याण-मुरबाड रस्ता पाण्याखालीमुरबाड : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात जोरदार पावसाने नदी, नाले भरून वाहू लागले आहेत. कल्याण-मुरबाड रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत ठप्प होती. यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. शिवाय, काही निवासी वसाहतींमध्ये नाल्याचे पाणी शिरले. किशोर आरोग्य केंद्राच्या परिसरात पाणी भरल्याने या आरोग्य केंद्राचा संपर्कतुटला. शहरातील विद्यानगर, गुरूकृपा या वसाहतींमध्ये व गोरेपाडा परिसरात पाणी शिरल्याने काहीकाळ रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. तसेच या ठिकाणी सार्वजनिक नाल्यावर बिल्डरांनी बांधकाम केल्याने नाल्यांचे पाणी निवासी वसाहतीमध्ये शिरल्याने नागरिकांनी नगरसेवकांना घेराव घालून आपल्या समस्या मांडल्या. मुरबाड- कल्याण हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली होती. किशोर आरोग्य केंद्रामागील नदी व नाल्याचे पाणी वाढल्याने या आरोग्य केंद्राचा संपर्कतुटला होता. येथील रु ग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कावळे यांनी सतर्कता बाळगून तत्काळ रुग्णांना इतरत्र हलवले. हा प्रकार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.कल्याण-बदलापूर रस्ता पाण्यातअंबरनाथ : शुक्रवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्व नाले भरून वाहत होते. अनेक सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरांत पाणी गेले. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचाच निर्णय घेतला.शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्यावर शनिवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला. सकाळी ८ वाजल्यापासून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अंबरनाथमधील कमलाकरनगर, कोहोजगाव, नालंबी रोड, बालाजीनगर या भागात पाणी साचले होते. तर, शहरातील महत्त्वाचा रस्ता असलेल्या विम्कोनाका रोड, मोरिवली रोड या दोन रस्त्यांसह पूर्व भागातील बी केबिन रोड पूर्ण पाण्याखाली गेला होता. या भागातून दुचाकीस्वारांना जाणेही अवघड जात होते. स्वामीनगरचा नाला भरून वाहत असल्याने किनाºयावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. स्टेशन परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना चालणेही अवघड जात होते. सकाळी लोकलसेवाही संथगतीने सुरू राहिल्याने स्टेशनवरही प्रवाशांची गर्दी झाली होती.कोंडेश्वर धबधबाहीझाला धोकादायकबदलापूरमधील पर्यटकांच्या पसंतीस उतरणारा कोंडेश्वर धबधबाही पावसामुळे धोक्याच्या पातळीवर होता. पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने कोंडेश्वर धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी पिकनिकसाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी भोज धरणावरील बंधाºयाखालीच पोहण्याचा आनंद घेतला.एरंजाड-टिटवाळारस्ता बंदएरंजाडहून टिटवाळ्याला जाण्यासाठी असलेला रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक झाला होता. या रस्त्यावरील चंद्रा नदीवरील पुलाखाली पाण्याचा प्रवाह वाढला होता. सकाळी हे पाणी थेट पुलावरून वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नदीपात्रातील पाणी कमी झाल्यावर दुपारनंतर हा पूल पुन्हा सुरू करण्यात आला.गरम पाण्याची कुंडे पाण्याखालीवज्रेश्वरी : मुसळधार पावसामुळे वज्रेश्वरीतील तानसा नदीला पूर आल्यामुळे अकलोली येथील गरम पाण्याची सातही कुंडे पाण्याखाली गेली आहेत.भिवंडी ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गरम पाण्याची कुंडे पुरामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अंघोळीसाठी येणाºया पर्यटकांनी तेथे जाऊ नये. दुर्घटना घडू नये, याकरिता अकलोलीचे उपसरपंच योगेश पाटील यांनी स्वत: खबरदारी घेऊन कुंडाकडे जाणाºया मार्गावर बांबू लावून मार्ग बंद केला.शिव मंदिरातील गाभाºयात चार फूट पाणीअंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिरालाही पावसाचा फटका बसला. मंदिराशेजारील वालधुनी नदी दुथडी भरून वाहत होती. या नदीवरील पुलावरून हे पाणी जात असल्याने हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला. शिव मंदिर परिसरातही पाणी साचले होते. मंदिराच्या गाभाºयात चार फूट पाणी साचल्याने शिवलिंग पाण्याखाली गेले. मंदिरातील शंकराची मूर्ती मंदिराबाहेर काढावी लागली.४२ गावांचा संपर्क तुटलावासिंद : पावसामुळे वासिंद रेल्वेपूल, शहापूर मुख्य रस्त्यावरील बोहरी इमारतीजवळ, कासणे गावाजवळील पूल, वासिंद पूर्वेकडील स्वामी विवेकानंदनगर आदी ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वासिंद पूर्व-पश्चिमेला जोडणाºया रेल्वेपुलाखालील पाण्यामुळे शहापूर, कल्याण तालुक्यांतील ४२ गावांचा संपर्कतुटला. वासिंद-शहापूर मुख्य रस्त्यावर खातिवली ग्रामपंचायत हद्दीतील बोहरी इमारतीजवळ पाणी साचल्याने येजा करणाºयांची तारांबळ उडाली. नैसर्गिक नाले बंद केल्याने पाणी साचले, असे शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण जाधव यांनी सांगितले. वासिंद-अंबाडी रस्त्यावरील कासणे गावाजवळील पूल पाण्याखाली गेला. वासिंद पूर्वेकडील स्वामी विवेकानंदनगरमधील शिक्षक कॉलनीमध्ये १६ घरांमध्ये पाणी शिरल्याचे येथील रहिवासी सुरेश पाटील यांनी सांगितले.मीरा रोडमध्येही सखल भागात साचले पाणीमीरा रोड : शनिवारी झालेल्या मुसाळधार पावसाने मीरा रोडलाही झोडपून काढले. काशिमीरा महामार्ग, कृष्णस्थळ, बेकरीगल्ली, विजयपार्क, सिल्व्हर सिटी या सखल भागात पाणी साचले होते. महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू होती.पुरामुळे संसार पडले उघड्यावरलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील वालधुनी व लहानमोठ्या नाल्यांनी धोकादायक पातळी गाठल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शेकडो जणांच्या घरांत पुराचे पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. आयुक्त गणेश पाटील यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून सतर्कतेचा इशारा दिला.उल्हासनगरमध्ये संततधार पावसाने गोलमैदान, निरंकारी हॉल, शहाड फाटक, शांतीनगर, गुलशननगर, मातोश्री मीनाताई ठाकरे, सीएचएम कॉलेज परिसर, सम्राट अशोकनगर, राजीव गांधीनगर, रेणुका सोसायटी, हिराघाट आदी परिसरांत पावसाचे व वालधुनी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने शेकडो जणांचे संसार उघड्यावर आले. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने अनेकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांची राहणे व जेवणाची व्यवस्था केली. रिजन्सी हॉल परिसरात जुने आंब्याचे झाड पडल्याने गाडीसह दुचाकीचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून झाडे हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती सुरक्षा अधिकारी बाळू नेटके यांनी दिली.सीएचएम महाविद्यालय प्रांगणात वालधुनीच्या पुराचे पाणी शिरले होते. कॅम्प नं-३ येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयासह अन्य शाळांत पाणी शिरल्याने शाळेला सुटी देण्यात आली. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही आयुक्तांसह प्रभागात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नाल्याची साफसफाई न झाल्याने, पाण्याचा निचरा होऊ शकला नाही.उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळीबदलापूर : दोन दिवसांपासून पडणाºया मुसळधार पावसाचा फटका बदलापूरलाही बसला. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी परिसरातील ग्रामस्थ चिंतेत होते. उल्हास नदीच्या पाण्याला प्रवाह असल्याने नदीपात्रात कुणी जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या होत्या. उल्हास नदीवरील पुलाच्या खालून मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत होते. पुलाच्या शेजारी असलेला लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. बदलापूरची चौपाटीही पाण्याखाली गेली होती. नदीपात्रात कुणी जाणार नाही, यासाठी अग्निशमन विभागाचे अधिकारी तैनात करण्यात आले होते. पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी बदलापूरकरांनी गर्दी केली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक
भिवंडीत कामवारी नदीला पूर, जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 3:32 AM