भिवंडी: काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द; एकनाथ शिंदेंच्या खात्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:44 AM2023-06-27T10:44:07+5:302023-06-27T10:44:48+5:30
5 डिसेंबर 2019 मध्ये महापौर व उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार यांच्या विरोधात मतदान करून बंडखोरी केली होती.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले होते. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या होत्या. तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान हे विजयी झाले होते. या १८ बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.
भिवंडी महानगरपालिकेतील 18 बंडखोर काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यासह या नगरसेवकांना पुढील 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. नगरविकास विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकाल दिला आहे.
5 डिसेंबर 2019 मध्ये महापौर व उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार यांच्या विरोधात मतदान करून बंडखोरी केली होती. त्या विरोधात माजी महापौर जावेद दळवी यांनी सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
केसीआर यांनी घेतले विठुरायाचे दर्शन; सरकारने वाहन देऊनही चालत निघाले.https://t.co/CbvSFUB0GJ#KCR#BRS#Solapur#Pandharpur
— Lokmat (@lokmat) June 27, 2023
काय घडलेले राजकारण...
महापौर पदासाठी कॉग्रेस तर्फे रिषिका राका व भाजप - कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात असल्याने पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय ( एकतावादी ), समाजवादी पक्ष व भाजप बरोबरच काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी कोणार्कच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या 49 मतांनी विजयी झाल्या. तर शिवसेना काँग्रेस युतीच्या नगरसेविका रिषिका राका यांना अवघी 41 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकूण 47 नगरसेवक होते. तिथे काँग्रेस आणि शिवसेनेतची सत्ता होती. भिवंडी महापालिकेत 90 नगरसेवक असून त्यामध्ये कॉग्रेसचे 47, शिवसेना 12, भाजप 20, कोणार्क विकास आघाडी 4, समाजवादी पार्टी 2, आरपीआय (एकतावादी ) 4, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होते.