शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

भिवंडी मनपा प्रशासनाची कचरा ठेकेदारावर मेहरबानी; कोट्यावधींचा खर्च, तरीही ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग

By नितीन पंडित | Published: October 09, 2023 4:21 PM

घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी शहरात स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असून शहर स्वच्छतेबाबत मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.विशेष म्हणजे कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर मेहरबानी म्हणून कोट्यवधींची यंत्रसामुग्री एक रुपया भाड्याने आंदण देऊनही ठेकेदारावर कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. शहरात मुख्य रस्त्यांबरोबरच अनेक ठिकाणी हिंदू व मुस्लिम भागात ठीकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणेदोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.

शहरात दररोज साडेचारशे टन कचरा उचलला जात असून हा कचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासने आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट् प्रा. लि.या कंपनीस प्रति टन १२२९ रुपये दर निश्चित करून सहा वर्षांसाठी ठेका दिला आहे.यासाठी ठेकेदाराला सुमारे २२ कोटी ७५ लाख ७४ हजार ५२७ रुपये वार्षिक दिले जाणार आहेत.यासाठी मनपाने ठेकेदाराला ५० घंटागाड्या व २३ रेफ्युज कलेक्टर अशी सुमारे १० कोटी रुपयांची वाहनेनाममात्र १ रुपया प्रतिमहा भाडयाने ठेकेदाराला आंदण दिली आहेत.

 घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती.मात्र या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने ही कचरा संकलन केंद्र अक्षरशः उकिरडे झाले.त्यांनतर जनाक्रोश वाढल्याने काही ठिकाणी कचरा संकलन बंद करण्यात आली मात्र खडक रोड येथील कचरा संकलन हे मुख्य बाजारपेठेत चहूबाजूने निवासी व व्यापारी अस्थापनांच्या मधोमध आहे. येथे कचरा संकलन केंद्राला डम्पिंगचे स्वरूप आले असून दुर्गंधीने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील भिवंडी कल्याण या मुख्य रस्त्यावर नवी वस्ती जवळ असलेल्या वेलकम हॉटेलसमोर कचऱ्याचा भयंकर ढिग साचला असून शहरात अंतर्गत रस्त्यावर कचऱ्याचे ढिग मोठ्या प्रमाणात साचले आहेत.या कचरा कोंडीमुळे शहरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सध्या नवरात्रीउत्सव तोंडावर आला असतांनाच एन सणाच्या पार्श्वभूमीवर तरी महापालिका नागरिकांच्या आरोग्य समस्याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी