शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

भिवंडी पालिकेसमोर ३३० कोटी वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:30 AM

नागरिकांकडून करवसुली करण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. त्यामुळे दरवर्षी थकबाकीच्या रकमेत वाढ होऊन महापालिकेस आर्थिक फटका बसतो.

भिवंडी : महापालिकेपुढे आर्थिक संकट असल्याची बतावणी करणाऱ्या अधिकाºयांसमोर सध्या शहरातील करदात्यांकडून ३३० कोटी रूपये वसूल करण्याचे आव्हान निर्माण झाले असून त्यासाठी पालिकेच्या पाच प्रभागांतून पाच पथके रवाना झाली आहेत.महापालिका क्षेत्रात एकूण पाच प्रभाग समिती कार्यालये कार्यरत आहेत. नागरिकांकडून करवसुली करण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. त्यामुळे दरवर्षी थकबाकीच्या रकमेत वाढ होऊन महापालिकेस आर्थिक फटका बसतो. ही बाब आयुक्त मनोहर हिरे व उपायुक्त वंदना गुळवे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने वसुली विभाग अधिकारी व प्रभाग अधिकाºयांची बैठक घेऊन कानउघाडणी केली. तसेच १५ दिवसांत १५० कोटी वसुलीचे लक्ष्य ठरवून करवसुली करण्याचे आदेश दिले आहेत.२०१८-१९ या वर्षासाठी मागील थकबाकी धरून एकूण ३४४ कोटी ८४ लाख ९६ हजार ३४६ रुपये मालमत्ताधारकांकडून येणे असून त्यापैकी प्रभाग-१ मध्ये ११४ कोटी ८२ लाख ८२ हजार ४८७ रुपये, तर प्रभाग-२ मध्ये ७३ कोटी ६४ लाख सात हजार ५१२ रुपये, प्रभाग-३ मध्ये ६२ कोटी ९२ लाख ६८ हजार ३०१ रुपये, प्रभाग-४ मध्ये ५५ लाख २७ हजार ४९ हजार ३३३ रुपये, प्रभाग-५ मध्ये ३८ कोटी १७ लाख ८८ हजार ७१३ रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी आॅक्टोबर महिन्यापर्यंत १४ कोटी २३ लाख ३३ हजार ५६७ रुपये वसुली पालिका अधिकाºयांनी केली आहे. उरलेली थकबाकी ३३० कोटी ६१ लाख ६२ हजार ७७९ रुपये आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMuncipal Corporationनगर पालिका