भिवंडी: भिवंडी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे तीन तेरा उडाल्याचे चित्र शुक्रवारी समोर आले.सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी थेट मनपाच्या शाळेत शिरल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मोठी तारांबळ उडाली होती.
भिवंडीतील धामणकर नाका परिसरात महापालिकेची शाळा क्रमांक ६३ हि उर्दू शाळा असून या शाळेची इमारत देखील धोकादायक झाली आहे.मात्र मनपा प्रशासनाच्या शिक्षण विभागाने मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर भरविण्यात येणारी शाळा तळमजल्यावर भरविण्यात येत आहे.शुक्रवारी या शाळेत पावसाचे पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना बेंचच्या वर बसून आपले अभ्यास करण्याची वेळ आली होती. या घटनेतून भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजल्याचे चित्र समोर आले आहे.