- पंढरीनाथ कुंभारभिवंडी : दररोज तीस हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या भिवंडी एसटी आगारास दोन वर्षांपासून आगारप्रमुखाची नेमणूकच झालेली नसल्याने प्रवासी व कर्मचाºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दोन वर्षांपासून झालेले खड्डे वेळीच न बुजवल्याने महिनाभर झालेल्या पावसाने आगारात पाणी साचून तळे झाले आहे.एसटी आगारातून ठाणे व कल्याण मार्गावर अधिक बस धावत असून रोज येथून ३० हजार प्रवासी प्रवास करतात. तर बाहेरगावाहून येणाºया बसमधून २० हजार प्रवासी प्रवास करतात. या आगारातून महामंडळास चांगला फायदा होत असताना राज्य परिवहन मंडळाचे या आगाराकडे दुर्लक्ष होत आहे. तीन वर्षापूर्वी पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यामुळे आगाराचे पूर्णपणे डांबरीकरण केले. हे डांबरीकरण करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. यामुळे गेल्यावर्षीही आगारात खड्डे पडून पाणी साचले होते.यावर्षी आगारात झालेल्या खड्ड्यांनी आगाराची दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने आगारातील स्थानकाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ मोठे तळे झाले आहे. तर आगारात खड्डे झाल्याने प्रवाशांना बसमध्ये चढणे व उतरण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. बस पकडण्याच्या धावपळीत काही विद्यार्थी व जेष्ठ नागरिक खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. असे अपघात होऊ नये म्हणून भिवंडी आगाराच्या व्यवस्थापनाने मार्च-एप्रिलमध्ये लेखी पत्र ठाणे विभागीय कार्यालयाला दिले आहे. परंतु बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने प्रवासी, बस चालकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.कमी कालावधीसाठी अधिकारीमागील दोन वर्षापासून आगार व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने आगाराचे व्यवस्थापन प्रभारी अधिकारी सांभाळत आहेत. त्यामुळे आगारातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी अडथळे येत आहेत. दरम्यानच्या काळात राठोड नावाच्या अधिकाºयाची वर्णी लागली होती. परंतु त्यांची नेमणूक अत्यल्प काळाचीच ठरली.पत्राकडे पालिकेचे दुर्लक्ष : आगाराबाहेरील रस्ते व गटाराची उंची वाढत असल्याने आगारातील जमीन खाली गेली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. मात्र आगाराच्या मागील बाजूस अथवा आगारातील कर्मचारी निवासस्थानाच्या जागेतून पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकतो. यासाठी आगार व्यवस्थापनाने महापालिकेकडे पत्र दिले आहे. परंतु त्याकडे पालिकेच्या शहर अभियंत्यासह इतर अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे.
भिवंडी एसटी आगार गेले खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 2:39 AM