भिवंडी - कोरोना काळात महसूल यंत्रणा कामात व्यस्त असतानाच भिवंडी तालुक्यातील रेतीमाफियांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याने भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल्हेर रेतीबंदर येथे नुकताच कारवाई करून प्रत्येकी एक सक्शन पंप व बार्ज करेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला असून दोन सक्शन पंप व एक बार्ज हा बुडविण्यात आला आहे.
नायब तहसीलदार गोरख फडतरे, मंडळ अधिकारी खारबाव टाकवेकर,अप्पर भिवंडी चंद्रकांत राजपूत, दिघाशी अरुण शेलार या पथकाने केलेल्या कारवाईत १६ लाखांचे एक बार्ज व एक सक्शन पंप जप्त करण्यात आला असून २० लाखांचे दोन सक्शन पंप व एक बार्ज खाडी पात्रात बुडविण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली असून अज्ञात रेती माफियांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.