भिवंडी महिला शहराध्यक्षा अजित पवारांच्या गटात सामील; शरद पवार गटाला धक्का
By नितीन पंडित | Updated: July 5, 2023 17:50 IST2023-07-05T17:50:16+5:302023-07-05T17:50:36+5:30
अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचे भिवंडी शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांनी भिवंडीतील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.

भिवंडी महिला शहराध्यक्षा अजित पवारांच्या गटात सामील; शरद पवार गटाला धक्का
भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पडलेल्या फुटी नंतर सुरुवातीला शरद पवारांसोबत असलेल्या भिवंडी महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे या बुधवारी अजित पवार गटात सहभागी झाल्या आहेत.महिला शहराध्यक्षांनी थेट अजित पवारांची साथ दिल्याने भिवंडीतील राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याची शक्यता वर्तविण्यात आहे.
अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचे भिवंडी शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांनी भिवंडीतील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. यावेळी स्वाती कांबळे यांनीही आपण शरद पवारांसोबतच राहू अशी भूमिका स्पष्ट केली होती.मात्र बुधवारी अचानक स्वाती कांबळे या आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात सहभागी झाल्या आहेत. येत्या काळात आपल्या सोबत अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात सहभागी होतील असा गौप्यस्पोट देखील स्वाती कांबळे यांनी केला असल्याने भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.