शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भिवंडीच्या नाट्यमय राजकारणात ‘कोणार्क’ ठरली बाजीगर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 12:23 AM

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली.

- नितीन पंडित

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली. काँग्रेसचे तब्बल १८ नगरसेवक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर सौदेबाजी झाल्याचे उघडच आहे. नगरसेवकांच्या या सौदेबाजीमुळे भिवंडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या नेतेमंडळींच्या ही हार मात्र चांगलीच जिव्हारी लागली आहे. एकहाती सत्ता असताना १८ नगरसेवक का फुटले? याचे चिंतन करण्याची वेळ काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर आली आहे. नुसते महापौरपदच गमावले नसून काँग्रेसचे वर्चस्व आणि अस्तित्वही पणाला लागले आहे.

भिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्कविकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. काँग्रेसचे नगरसेवक फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता २०१७ मध्ये शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेऊन उपमहापौरपद शिवसेनेला दिले होते. तेव्हा काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर, तर शिवसेनेचे मनोज काटेकर हे उपमहापौर झाले होते. काँग्रेसची शहरावर एकहाती सत्ता असतानाही शहराची वाताहत झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांवर जनतेचा रोष वाढला होता. त्यातच काँग्रेस पक्षश्रेष्ठींची महापालिकेत एकहाती हुकूमत होती. काँग्रेसचे अनेक नगरसेवक कर्जबाजारी असल्याने हीच संधी साधत कोणार्कच्या नेत्यांनी लाखो रुपयांची प्रलोभने दाखवून त्यांना आपल्याकडे खेचले. हा आकडा ३० लाखांच्या घरात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी दोन व्हिप काढले. एका व्हिपद्वारे त्यांनी काँग्रेसच्या नगरसेविका रिषिका राका तर दुसऱ्या व्हिपमध्ये कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. हे व्हिप काही दैनिकांमध्ये मतदानाच्या दिवशीच प्रसिद्ध केले होते. या व्हिपच्या आधारेच आपण कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान केले असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांनी दिले आहे. तर दुसरीकडे आपण कोणार्कच्या बाजूने मतदान करण्याचा कोणताही व्हिप प्रसिद्ध केला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. एकंदरीतच आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भिवंडी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोट्यवधींचा सौदा झाला हे उघड आहे.

भिवंडीचा राजकीय इतिहास पहिला तर मुस्लिमबहुल मतदार जास्त असल्याने येथे काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरात नुसते महापौरपद नाही तर आमदार, खासदार ही पदेही पडली आहेत. निवडून आलेला काँग्रेस नेता सत्ता आपली जहागिरी असल्याप्रमाणे वागत असल्याने ती टिकवणे वेळोवेळी कठीण झालेले आहे. तसेच जनकल्याणाऐवजी स्वत:च्या आर्थिक सुबत्तेकडेच लक्ष देत असल्याने त्याचा फटका पक्षाला स्थानिक पातळीवर बसत आहे. मुस्लिम मते ही काँग्रेसची हक्काची आहेत, ही वृत्ती मारक ठरत असून मतदार आता हुशार झाले आहेत आणि ही बदलती परिस्थिती काँग्रेसचे नेते मानायला तयार नाहीत. त्यामुळेच खासदार, आमदार या पदांबरोबरच आता महापौरपदही काँग्रेसला गमवावे लागले आहे.

अहंकार आणि सौदेबाजी यामुळे काँग्रेस रसातळाला गेली असून विधानसभा निवडणुकीत पूर्वेत समाजवादी पक्ष आणि पश्चिमेत एमआयएमने डोके वर काढले आहे. याचा फटका भविष्यात काँग्रेसला निश्चितच बसणार आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघ सध्या समाजवादीच्या ताब्यात आहे, तर पश्चिम मतदारसंघ भाजपकडे आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असलेली काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तिसºया क्रमांकावर फेकली जाते, यातच सर्वकाही आले. पश्चिममध्ये एमआयएमचा शेवटच्या क्षणाला निसटता पराभव झाला होता. याची जाण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना असती तर आर्थिक घोडेबाजाराला काँग्रेसला लगाम घालता आला असता. नगरसेवक फुटणे ही पक्षासाठी भविष्यातील धोक्याची घंटाच असून पक्षनेतृत्वाने ती वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीShiv Senaशिवसेना