भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यात संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३८८ वा जन्मदिवस रविवार रोजी साजरा होत असताना त्यांच्या मुर्तीचे शिवाजी मंदिर भिवंडी-वाडा रोडवरील दुगाड गावाजवळ मराडेपाडा येथे होत आहे.या मंदिराचा भूमीपुजन सोहळा ढोलताश्यांच्या गजरात ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे भूमीपुजन ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंदिराच्या संकल्प चित्राचे प्रकाशन करण्यात आले. शिवक्रांती प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी शिवजयंती साजरी करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली.त्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी संकल्प करून शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी सव्वा एकर जागा विकत घेतली.या मंदिराची रूपरेषा शिवकालीन आहे.तसेच तालुक्यातील छत्रपतींचा इतिहास व पराक्रम या निमीत्ताने मंदिर परिसरात अधोरेखीत केला जाणार आहे,अशी माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे आयोजक राजाभाऊ चौधरी यांनी सांगीतले.मंदिराच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणांत सांगीतले की,‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक दिवस साजरी करून न थांबता त्यांचे दररोज स्मरण करणे गरजेचे आहे.वज्रेश्वरी देवीच्या परिसरांत होणारे हे मंदिर तरूणांना प्रेरणादायी ठरणार आहे.’अशी ग्वाही देत त्यांनी शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजाभाऊ चौधरी व त्यांच्या सर्व सहकाºयांचे या निमीत्ताने अभिनंदन केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते सभापती सुरेश (बाळा)म्हात्रे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील , आमदार रु पेश म्हात्रे, आमदार शांताराम मोरे ,भिवंडी शहरप्रमुख सुभाष माने , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इरफान भुरे , शिवभक्त कलावंत सचिन गवळी यांच्यासह मान्यवर व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते .
महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर भिवंडीत पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:02 AM
भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यात संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३८८ वा जन्मदिवस रविवार रोजी साजरा होत असताना त्यांच्या मुर्तीचे शिवाजी मंदिर भिवंडी-वाडा रोडवरील दुगाड गावाजवळ मराडेपाडा येथे होत आहे.या मंदिराचा भूमीपुजन सोहळा ढोलताश्यांच्या गजरात ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.मराडेपाडा ...
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातसव्वा एकर जागेवर बनणार छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरमहाराजांचे भिवंडीतील पराक्रम व इतिहास मंदिर परिसरांत अधोरेखीत