ठाणे: बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका याला यांनी तिलांजली दिली, आपल्या तत्वांशी तडजोड करून महाविकास आघाडीत सोबत गेले, त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाण्यातील कोपरी पूर्व येथे चैत्र नवरात्रौत्सव मंडपात गुरुवारी रात्री कल्याण मधील उद्धव सेनेतील कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक अरविंद पोटे हे कल्याणमधील सुमारे १०० पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. यात कल्याण पूर्व आणि पश्चिम मधील कार्यकर्त्यांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले.
त्यांच्या प्रवेशाने कल्याण उद्धव सेनेला मोठा फटका बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेत आजही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीने काम सुरू आहे. राज्यात मागील दोन वर्षात विविध विकास कामे झाली आहेत, ही विकास कामे पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत आहेत. त्यांना घरी बसणारा फेसबुकवरील नेता नको आहे त्यांना फेस टू फेस बोलणार नेता हवा असल्याचेही ते म्हणाले.
तिकडे ८० टक्के समाजकारण आणि 20% राजकारण अ न होता केवळ राजकारणच केले जात होते त्या राजकारणाला कंटाळूनच आम्ही आज मूळ शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. असे मत कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांनी व्यक्त केले.