कल्याण-आधारवाडी डंपिंग ग्राऊंडच्या कच:याला आज दुपारी एक वाजता आग लागली. ही आग मोठी होती. ती विझविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्नीशमन दलाने धाव घेतली. दुपारी सुटलेल्या वा:यामुळे आग वाढली होती. आगीचे लोट आकाशाला भिडले होते. आगीचा धूर सगळीकडे पसरल्याने नागरीकंच्या नाकातोंडात धूर गेला. लोक रस्त्यावर आले होते.
आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर दररोज 640मेट्रीक टन कचरा टाकला जातो. त्याठिकाणी कच:याचा 25 मीटरचा डोंगर आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील कचरा 40 टक्के कमी झाला. तरी देखील 360 मेट्रीक टन कचरा टाकला जातो. कचरा कमी येत असला तरी त्याठिकाणी कच:याचा डोंगर जैसे थे आहे. या कच:याच्या तळाशी उन्हाळ्य़ात प्रचंड तापमानामुळे मिथेन वायू तयार होतो. तो सूर्य प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर आग लागते. मिथेन वायू तयार होऊन ही आग लागल्याच्या प्राथमिक अंदाज प्रशासनाच्या वतीने घनकचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त गणोश बोराडे यांनी व्यक्त केला आहे. आग लागल्याचे समजताच महापालिका आयुक्त डॉ. विज सूर्यवंशी हे डंपिंगवर पोहचले. त्याठिकाणी आगची पाहणी केली.
आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या सहा बंब गाडय़ा व 4 पाण्याचे टँकर मागविण्यात आले. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले असून सायंकाळी सहा वाजेर्पयत आग आटोक्यात आणली जाईल असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. वा:यामुळे आग आगीने मोठे स्वरुप धारण केले होते. डंपिंगच्या जवळपास सीएनी पंप आहे. तसेच पॉवर स्टेशन आहे. त्याठिकाणी ठेवलेल्या प्लास्टीक ड्रमनेही पेट घेतला. डंपिगच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकाना प्रथम वाटले की त्यांच्या झोपडीस आग लागली आहे. आगीचा धूर डंपिंग परिसरात पसरला होता. धूरामुळे दुपारच्या वेळी नागरीकांचे श्वास कोंडला. काही नागरीक रस्त्यावर आले. लॉकडाऊनमध्ये प्रत्येकांनी घरी राहावे असे सांगितले जात असले तरी नागरीक धूरामुळे घराबाहेर पडले.