ठाणे : ट्रक मालवाहतूकदारांच्या संपाची झळ खऱ्या अर्थाने बुधवारपासून बसणार आहे. लांबपल्याची अवजड वाहने २० जूनपर्यंत आहे त्या जागेवरच उभी करण्याची सक्ती मालवाहतूकदारांच्या संघटनेने केली आहे. ती उभी राहिल्यानंतर मालाची आवक -जावक बंद होईल. या सक्तीमुळे कोणताही ट्रक मालक भाडे बूक करीत नसल्याचे ठाणे जिल्हा ट्रक्स -टेम्पो असोसिएशनचे सुनील मोर्य यांनी लोकमतला सांगितले.देशभरातील मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाच्या कालावधीत ठाणे, नवी मुंबई परिसरातील सुमारे सहा हजार ट्रकची वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे मालवाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशन (एआयएमआयसी) व आॅल इंडिया कॉन्फडरेशन आॅफ गुडस् व्हेईकल्स ओनर असोसिएशन (एआयसीजीव्हीओ) या संघटनांच्या नेतृत्त्वाखाली हा संप आहे. दिलेल्या मुदतीत इच्छीत स्थळी उभे राहणे अपेक्षित असल्याने ट्रक, चालक, मालक कोणतीही बुकिंग घेत नसल्याचे दिसते आहे. गाडीची तोडफोड होण्याची भीती असल्याचे मोर्य यांनी सांगितले. यात ठाणे जिल्हा ट्रक्स -टेम्पो असोसिएशन सहभागी असल्याचे सुतोवाच केले.>पहिल्या दिवशीसंपाचा परिणाम नाहीसंपातून जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतूकीस वगळले आहे. पण सोमवारी सर्व महामार्गांवर तपासणी केली असता मोठे व लहान टेम्पो सुरळीत धावत आहेत. संपाची झळ कोठेही दिसली नाही. तरीदेखील अत्यावश्यक सेवांचा प्रश्न उद्भवल्यास परिवहन यंत्रणा सतर्क आहेत. परंतु, सोमवारपासून आजपर्यंत तरी या संपाचा कोठेही परिणाम दिसून आलेला नाही. नेहमी प्रमाण ट्रक्स व टेम्पो धावत असल्याचे तपासणीत दिसून आले आहे, असे आरटीओ अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.>यामुळे पुकारला संपरस्त्यावर धावत असलेल्या मोठी वाहने थांबल्यानंतरच संपाची झळ बसणार आहे. आमची वाहने आधीच उभी केल्या आहेत. डिझेलची मोठ्याप्रमाणात भाववाढ झाली. विम्याची रक्कम सुमारे ४५ हजार रूपये करण्यात आली, चालकांच्या वेतनात झालेली वाढ, यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हा देशपातळीचा संप पुकारल्याचे मोर्य यांनी स्पष्ट केले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातीलसुमारे सहा हजार ट्रक मालकांचा सहभाग आहे.
मोठी वाहने जिथे आहेत त्याच ठिकाणी थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 3:13 AM