--------------------------------
मोबाइलची चोरी
डोंबिवली : परेश मेहता हे पांडुरंग वाडी मानपाडा रोडवरून जात असताना एका ३० वर्षीय अनोळखी व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील मोबाइल चोरून नेला. हा प्रकार १६ ऑगस्टला सकाळी सातच्या सुमारास घडला. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------
रॉडने मारहाण
कल्याण : चंदर पवार हे खडेगोळवली कैलासनगर या ठिकाणी गुरुवारी रात्री ११.३० वाजता जेवण करून फेरफटका मारत असताना त्या ठिकाणी चौघे जण आले आणि त्यांनी पवार यांना भाई असे संबोधले. याबाबत पवार यांनी चौघांना विचारणा केली असता रागाच्या भरात त्यांनी पवार यांना शिवीगाळ धक्काबुक्की करून रॉडने मारहाण केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------------------------
आईच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
कल्याण : कवी आणि लोकमतचे पत्रकार अरविंद म्हात्रे यांच्या बाजार आणि गजगामिनी या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या मातोश्री सुंदराबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या हस्ते रविवारी गौरीपाडा येथे आले. यावेळी प्रकाशिका उर्मिला म्हात्रे, कृष्णकुमार म्हात्रे, नंदाबाई शिंगोळे, कुसुम भोईर, मनीषा म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, रोहित म्हात्रे, मृणाल म्हात्रे आणि निकिता पाटील उपस्थित होते. कोरोना काळ असल्याने प्रकाशनाचा जाहीर कार्यक्रम न करता मातोश्रींच्या हस्ते घरातच हा छोटेखानी कार्यक्रम केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.
-----------------------------------------
अतिरिक्त जादा लस मिळावी
कल्याण : महाराष्ट्र राज्य तसेच विशेषत: कल्याण-डोंबिवली महापालिकेला विशेष बाब म्हणून अतिरिक्त कोविड लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप, बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान प्रदेश सहसंयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजू राम यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन केली आहे.
------------------------------------------
लसीकरण शिबिर
कल्याण : कोरोना समुपदेशन समिती आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पुण्यार्थी टॉवर, बेतूरकरपाडा येथे लसीकरण शिबिर राबविले. पुण्यार्थी क्रिएटिव्ह वर्ल्ड या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पुण्यार्थी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. या संस्थेचेही शिबिराला सहकार्य लाभल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी दिली.
--------------------------------------------