अंबरनाथ : नगरपालिकेच्या ताब्यातील छाया रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असला, तरीही कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता याच रुग्णालयाने चार महिन्यांपासून वीजबिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महावितरणने रुग्णालय प्रशासनाला ताकीद दिली आहे. तर, सरकारकडून अनुदान न आल्याने बिल भरले गेले नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.नगरपालिकेच्या ताब्यातील डॉ. बी.जी. छाया रु ग्णालय सरकारकडे देण्यात आल्यानंतर काही महिने अंबरनाथ नगरपालिकेच्या तिजोरीतून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले. आता मात्र गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयातील १६ कर्मचाºयांना वेतन मिळू न शकल्याने कर्मचाºयांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न असताना आता या रुग्णालयाचे वीजबिल थकीत प्रकरण समोर आले आहे. मागील चार महिन्यांपासून रुग्णालयाने बिल न भरल्याने महावितरणचे अधिकारी वीजजोडणी तोडण्यासाठी रुग्णालयात आले होते. मात्र, सरकारकडून अनुदान न आल्याने ते बिल भरले न गेल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यावर बिल भरण्याची ताकीद महावितरणच्या अधिकाºयांनी दिली. मार्च महिना जवळ आल्याने जास्त काळ बिल थकविता येणार नाही, असेही प्रशासनाला स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालय हे सरकारच्या ताब्यात गेल्यापासून या ठिकाणी अनेक समस्या भेडसावत आहेत. आधी वेतन आणि नंतर वीजबिल थकीत असे एक ना अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. महावितरणने रुग्णालय प्रशासनाला शेवटची संधी दिली असून बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचे संकेत दिले आहे.पाण्याच्या टाकीची झाली दुरवस्थाछाया रुग्णालयाची दुरवस्था ही नित्याची बाब ठरत आहे. इमारतीची अवस्था बिकट असतानाच या इमारतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जी टाकी बांधण्यात आली आहे, त्याचीही अवस्था बिकट झाली आहे. या पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात झुडुपे तयार झाली आहेत. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. नियमित स्वच्छताही होत नसल्याचे दिसते. त्यामुळे या पाण्याच्या टाकीच्या परिसरात स्वच्छता करण्याची मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
...तर छाया रुग्णालयात अंधार, चार महिन्यांपासून बिल खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:26 AM