सचिन सागरेडोंबिवली : गुंतवणूकदारांना जादा व्याज देण्याचे प्रलोभन दाखवत त्यांना गुंतवणूक करणाऱ्यास भाग पाडणारे गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याची माहिती उघकीस येत आहे. निळजे येथील पलावा सिटी संकुलातील दोन फ्लॅट पोलिसांनी सील केले आहेत. आलिशान मोटारही जप्त केली आहे. त्याचबरोबर केरळ येथील मूळगावी त्यांनी कोट्यवधींची रुपयांची जमीन खरेदी केली असून तेथे रिसॉर्ट उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुनीलकुमार याने सुरुवातीच्या काळात डोंबिवलीतील एका सोन्याच्या दुकानात नोकरी केली. त्या दुकानातील सोन्या-चांदीच्या विक्रीबरोबरच इतर व्यवहार कसे चालतात, याची हळूहळू माहिती घेत पूर्वेला एका गाळ्यात ‘गुडविन’च्या नावाने स्वत:चे दुकान सुरू केले.
या दुकानात येणाºया ग्राहकांना सुनीलकुमारने विविध प्रलोभने दाखवली. त्याच्या मदतीला भाऊ सुधीशकुमार हा देखील होता.या दुकानात वाढणारी ग्राहकांची संख्या लक्षात घेता त्यांनी या दुकानापासून काही अंतरावर एक मोठे दुकान सुरू केले. या दोघांनी मिळून अगोदर ज्या-ज्या ग्राहकांना दागिने विकले होते, त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधत आपल्या दुकानातील आकर्षक योजनांचे प्रलोभन दाखवण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी केरळ येथून आपल्या गावातून अविवाहित पण सुशिक्षित तरुणांना येथे कामासाठी आणले. त्यांची राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था केल्याची माहिती एका कर्मचाºयाने दिली.
त्याचबरोबर टेलिकॉलर म्हणून काही जणांना त्यांनी कामावर ठेवले होते. टेलिकॉलिंगद्वारे तसेच मार्केटिंगच्या अन्य योजनांद्वारे ग्राहकांना दुकानातील विविध योजनांची माहिती देण्यात येत होती. ग्राहकांना माहिती दिल्यानंतर ज्या ग्राहकांना काही प्रश्न असतील अथवा अधिक माहिती हवी असल्यास त्यांना दुकानातील सेल्समनना भेटण्यास सांगितले जात होते. गुंतवणूकदार एखादा दुकानात गेला की, मग ग्राहकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याबरोबरच त्यांना एखादी गुंतवणूक करण्यास भाग पाडण्याचे काम सेल्समन करत होते.
त्याचबरोबर, ग्राहक किती रक्कम जास्त गुंतवणार आहे, त्यावर त्यांना किती व्याज द्यायचे ठरविण्यात येत होते. लाखो रुपयांची गुंतवणूक असेल तर १८ टक्के व्याज तर हजारो रुपयांची गुंतवणूक असेल तर १६ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचे निश्चित केले जात, असेही एका कर्मचाºयाने सांगितले.कर्मचारीही गुंतवणूकदार‘गुडविन’मधील कर्मचाऱ्यांना आकर्षक वेतनाबरोबरच पाच टक्के कमिशन देण्यात येत होते. मात्र, कर्मचाºयांच्या वेतनातील तीन टक्के रक्कम गुडविनमधील विविध योजनांमध्ये गुंतवावी लागत होती. दुसरीकडे कामावर येण्यास उशिरा झाल्यास वेतन कापले जात होते. त्यामुळे हातात कमी वेतन पडत असल्याचेही एका कर्मचाºयाने सांगितले.आकर्षक वेतन, कमिशनसेल्समन आणि टेलीकॉलिंगसाठी स्थानिकांनाच प्राधान्य दिले जात होते. मात्र, यांच्यावर असलेल्या मॅनेजमेंटमध्ये सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांनी आपल्या गावातील तरुणांचा भरणा केला होता. आकर्षक वेतनाबरोबरच त्यांना कमिशन देण्यात येत होते.