शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

जैविक कचऱ्याची प्राणाशी गाठ

By admin | Published: December 22, 2015 12:32 AM

कल्याण-डोंबिवलीसोबतच आसपासच्या शहरांतील जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मान्यतेअभावी रखडल्याने या शहरांचे आरोग्य धोक्यात आले आहे

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंबिवलीसोबतच आसपासच्या शहरांतील जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मान्यतेअभावी रखडल्याने या शहरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या या कचऱ्यावर तळोजात प्रक्रिया होते, पण ती प्रक्रिया खर्चिक आहे. जैविक कचरा वाढत असूनही पालिकेचा प्रकल्प तयार असलेला प्रकल्प वापरात नसल्याने प्रक्रियेअभावी फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा नवा धोका या शहरांपुढे उभा ठाकला आहे. कल्याण-डोंबिवलीसोबत बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड मधील रुग्णालये-लॅबमधील कचराही येथे येतो. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने खाजगी कंत्राटदाराला ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर काम दिले आहे. कंपनीने प्रकल्प बांधून तयार केला आहे. तो सुरु करण्यास प्रदूषण मंडळाने तात्पुरती मंजुरी दिली आहे. पण कायमस्वरुपी मंजुरीसाठी महापालिकेने मंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तो कधी सुरु होईल याविषयी कोणतीही माहिती पालिकेकडे नाही. पाठपुरावा सुरु असल्याचे ठराविक छापाचे उत्तर सध्या दिले जाते. महापालिकेने घनकचरा प्रकल्प राबविण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शहरातील नव्या इमारतीच्या बांधकामाला एप्रिलमध्ये स्थगिती दिली. त्यावर सुनावणी सुरु आहे. या स्थगितीविरोधात पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पालिकेने जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रकल्पही अद्याप सुरु केलेला नाही. महापालिकेने ‘एन-व्हिजन’ या गुजरातच्या कंपनीला दहा वर्षासाठी ‘बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचे कंत्राट दिले. उंबर्डे येथे दोन एकर जागाही दिली. तीन टन जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. प्रकल्प बांधून तयार आहे. कंत्राटदार महापालिकेला महिन्याला पाच लाख ३१ हजार रुपयांची रॉयल्टी देणार आहे. रुग्णालयातील प्रत्येक खाटेमागे कंत्राटदार डॉक्टरांकडून प्रत्येक किलो जैव कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ३३ रुपये आकारणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २४५ सरकारी व खाजगी रुग्णालये आहेत. १४० लॅब आहेत. ३३० अन्य दवाखाने आहेत. महापालिका जैव वैद्यकीय कचऱ्यावर यापूर्वी प्रक्रिया करीत होती. यापूर्वीचे कंत्राट संपल्याने नवा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका फॅसिलिटेटरच्या भूमिकेत असल्याने बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर आणि मुरबाडमधील ३६१ रुग्णालये, लॅब आणि दवाखान्यांचा कचराही येथे येतो. त्यातून दररोज १८०० किलो कचरा गोळा होतो.