नवी मुंबई : रुग्णालये आणि दवाखान्यात वापरण्यात आलेल्या वैद्यकीय जैविक टाकावू वस्तूंचा साठा ऐरोलीच्या खाडीकिनाºयावर आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरातील कोळीवाड्यातील मच्छीमारांत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.ऐरोली -पटनी नॉलेज सिटीच्या खाडी किनाºयाच्या निर्जनस्थळी वैद्यकीय जैविक वस्तूंचा साठा डम्प केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. यात मुदत संपलेली औषधे, दवाखान्यात वापरण्यात आलेल्या वस्तू, इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या आदींचा समावेश आहे. ऐरोली आणि दिवा कोळीवाडा येथील कोळी बांधव खाडीच्या याच परिसरात रात्रंदिवस मासेमारी करतात. खाडीत सोडल्या जाणाºया रसायनमिश्रित सांडपाणी व प्लॅस्टिक कचºयामुळे मासेमारी व्यवसाय अगोदरच धोक्यात आला आहे. आता यात जैविक कचºयाची भर पडू लागल्याने कोळी बांधवांनी संताप व्यक्त केला आहे.जुलै २00९ मध्ये घणसोली गावातील खाडीकिनाºयावर अशाच प्रकारे मोठ्याप्रमाणात टाकावू इंजेक्शन आणि औषधांचा साठा आढळून आला होता. त्यामुळे अनेक मच्छीमारांच्या हातापायांना जखम झाली होती. या पार्श्वभूमीवर दिवा-कोळीवाडा येथील कोळी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जैविक कचरा टाकणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऐरोली- कोळीवाडा मच्छीमार सेवा संस्थेचे अध्यक्ष धनाजी माणिक पाटील यांनी केली आहे.वैद्यकीय टाकाऊ औषधे आणि साहित्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे विशेष सुविधा करण्यात आली आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कंपनी या एजन्सीमार्फत हे काम केले जाते. त्यामुळे वैद्यकीय टाकाऊ औषधांचा जैविक कचरा कुठेही टाकू नये याविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वारंवार मार्गदर्शन केले जाते. मात्र त्यानंतरही असे प्रकार आढळत असतील तर संबंधितांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.- डॉ.दयानंद कटके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
खाडीकिनाऱ्यावर जैविक कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 4:17 AM