शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरु होणार पाच क्लस्टरचा बायोमेट्रीक सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 4:14 PM

ठाणे शहरातील क्लस्टरचा मार्ग टप्याटप्याने मोकळा होऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत क्लस्टरच्या पाच भागांना मंजुरी मिळाल्यानंतर आता या पाच भागांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानुसार यासाठी पालिकेने टिम तयार केल्या आहेत.

ठळक मुद्देपाच विविध कक्ष स्थापन करण्याचा निर्णयहरकती सुचनाही स्विकारल्या जाणार

ठाणे - ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्राच्या क्लस्टरचे बायोमेट्रीक सर्वेक्षण १ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. तसेच ३० जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची अंतीम पात्रता यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या.              दरम्यान क्लस्टरच्या कामाला गती मिळावी तसेच क्लस्टरसंबंधी प्राप्त होणाऱ्या तक्र ारींचा तातडीने निपटारा करण्याबाबत ५ विविध कक्ष स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णयही त्यांनी क्लस्टर आढावा बैठकीत घेतला. कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्रांचा नागरी पुनरूत्थान आराखड्यांना मंजुरी प्राप्त झाली असून या योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता यादी निश्चित करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर १ जानेवारीपासून ते १५ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १५ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत त्याविषयीच्या हरकती स्वीकारण्यात येणार असून २३ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत परिमंडळ उपायुक्त स्तरावर त्यांची सुनावणी होणार आहे. ही सुनावनी झाल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत अंतीम पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जागा मालक व लाभार्थी सदरची योजना कोणाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे याचा निर्णय घेतील. हा निर्णय त्यांच्या स्तरावर न झाल्यास महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रि येचा अवलंब करून विकासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.                दरम्यान या योजनेला गती मिळावी तसेच या योजनेच्या अनुषंगाने प्राप्त होणाºया तक्र ारींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ५ विविध कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये पात्रता आणि लाभार्थ्यांच्या अनुज्ञेय क्षेत्राविषयी निर्णय घेण्याबाबत परिमंडळ उपायुक्त यांच्या स्तरावर एका कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांचा समावेश राहणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या अनुषंगाने शाळा, हॉस्पीटल किंवा उद्यान अशा ज्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत त्याबाबत निर्णय घेण्याबाबत नगर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये शहर विकास विभागाचे अधिकारी आणि संबंध प्रभाग समितीचा कार्यकारी अभियंता यांचा समावेश राहणार आहे. हा कक्ष अस्तित्वातील सुविधा नियमित करणे, स्थलांतरित करणे, आवश्यकता वाटल्यास ती निष्काषित करणे किंवा नव्याने समाविष्ट करणे याबाबत निर्णय घेणार आहे.या योजनांच्या अनुषंगाने छाननी सल्ला कक्षाची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी किंवा उप जिल्हाधिकारी, निवृत्त तहसिलदार, निवृत्त तालुका किवा जिल्हा भूमापक अधिकारी तसेच निवृत्त सहकारी उप निबंधक यांचा समावेश राहणार आहे. तर कायदेविषक बाबींसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असून यामध्ये विधी सल्लागार तसेच दोन ज्येष्ठ विधिज्ञांचा समावेश राहणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त