ठाणे : २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. यासाठी ठाणे शहरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या मतदार दिनी युवा मतदारांना मतदान अधिकाराचा संदेश देण्यासाठी राम गणेश गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमास गुरूवारी हिंदी चित्रपट अभिनेत्या करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांनी येण्यास सहमती दर्शविली असल्याचे येथील उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले.मतदार दिनाचे औचित्य साधून गडकरीमध्ये गुरु वारी सकाळी ११ ते २ या दरम्यान खास युवा मतदारानासाठी देखील विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमास सुप्रिया पाठारे, उदय सबनीस, प्रवीण दवणे आदी कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी देखील चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल तसेच इतर मराठी कलाकारांनी उपस्थित राहून युवा मतदारांना संदेश दिला होता. या युवा मतदार दिनाच्या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंग आदी वरिष्ठ अधिकारी वर्ग देखील उपस्थिती राहणार आहेत.या कार्यक्र माचा मुख्य उद्देश युवा मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे हा असून ‘मतदार असल्याचा अभिमान - मतदानासाठी सज्ज’ हे घोषवाक्य यंदाच्या कार्यक्रमांसाठी जाहीर केले आहे. हा राष्ट्रीय मतदार दिन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि सर्वच १८ विधानसभा मतदार संघामध्ये साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विविध कार्यक्रमांपैकी अपंग मतदारांचा सत्कार करून त्यांची नाव नोंदणी करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच सहस्त्रक मतदार म्हणजे १ जानेवारी २००० रोजी जन्म झालेल्या नवीन तरु ण मतदारांचा सहस्त्रक मतदार म्हणून ठिकठिकाणी सत्कार होणार आहे. तर सैन्यदलातील मतदारांना यावेळी सहभागी करण्यात येणार आहेत. निवडणूक साक्षरता क्लब - भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार या जिल्हयामध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यांना देखील विविध कार्यक्रमांमध्ये सहाभागी करण्यात येणार आहेत.
युवा मतदारांना संदेश देण्यासाठी करिष्मा कपूरसह बिपाशा बसू गुरूवारी ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:42 PM
मतदार दिनाचे औचित्य साधून गडकरीमध्ये गुरु वारी सकाळी ११ ते २ या दरम्यान खास युवा मतदारानासाठी देखील विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्र मास सुप्रिया पाठारे, उदय सबनीस, प्रवीण दवणे आदी कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत.
ठळक मुद्दे मराठी कलाकारांचीही रेलचेलसुप्रिया पाठारे, उदय सबनीस, प्रवीण दवणे आदी कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित राहणारठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंग आदी वरिष्ठ अधिकारी