भिवंडी : शुक्रवारी दिलेल्या तोंडी आश्वासनांची पूर्तता न केल्याने आदिवासी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा भिवंडीत दाखल झाला आहे.१३ जून रोजी नाशिक येथून सुरुझलेला मोर्चा कसारा घाट उतरून शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाला होता.त्यावेळी स्थानिक काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या सोबत चर्चा घडवून आणली .परंतु मंत्र्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासना नंतर ही मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून शासन मागण्यांच्या पूर्तते बाबत परिपत्रक काढून आश्र्वासित करीत नाही. तो पर्यंत बिऱ्हाड मोर्चा सुरू राहील असा निर्धार संघटनेच्या अध्यक्षा रुपाली आंधळे यांनी बोलून दाखवला आहे.
शुक्रवार पासून शहापुर तालुक्यात तळ ठोकल्या नंतर सोमवारी सकाळी मोर्चेकरी भिवंडी तालुक्यात दाखल झाले. त्यांनी दुपारचा विसावा मुंबई नाशिक महामार्गावर कासणे येथे घेतला आहे. तेथे जेवणासाठी महामार्गावरच पंगत मांडल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.तेथे पडघा पोलिसांनी महामार्गावरील त्या भागातील वाहतूक एकाच मार्गीके वर वळविल्याने वाहतूक कोंडीचा सामना काही प्रमाणात वाहन चालकां ना करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील राज्यभरातून आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बि-हाड मोर्च्याचा आजचा सातवा दिवस असून शुक्रवारी मंत्रालयात झालेला चर्चेत तोंडी दिलेले आश्वासन सोमवारी संध्याकाळ पर्यंत तुम्हाला पुन्हा रूजू करून घेण्यासाठी परिपत्रक जारी करू असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले होते.परंतु सोमवारी सायंकाळी चार वाजता पर्यंत शासना च्या कोणत्याही प्रतिनिधींनी संपर्क साधला नसल्याची माहिती अध्यक्षा रुपाली आंधळे यांनी दिली आहे.तृतीय व चतुर्थ श्रेणी तील कर्मचारी आज सात दिवस उन्हातान्हाची पर्वा न करता आपला संसार घेवून रस्त्यावर उतरले तरी सरकार संवेदना दाखवत नसल्या बद्दल संघटनेच्या पदाधिकारी योगिता पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.